मूल : मूल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील आकापूर गावालगतच्या वळण मार्गावर झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. मृतक मोहित मधुकर चौधरी (32) रा. नवेगाव चक आणि गणेश राजु येसनसुरे (31) रा. सिंदेवाही हे दोघेही दुचाकी क्रमांक MH-34-BY-7678 ने मूल वरून सावली कडे जात असताना वेगात असलेल्या चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आकापूर च्या बाजूने असलेल्या महामार्गावरील लोखंडी बेरीकेटला धडकली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीची धडक लागताच लोखंडी बेरीकेट मार्गावर पडून दोन्ही दुचाकी स्वारांचा घटना स्थळीच मृत्यू झाला. मृतक दुचाकीस्वारांनी मूल वरून सावली कडे जात असताना मुलच्या दिशेने असलेले चारही बेरीकेट व्यवस्थित रित्या ओलांडले. त्यानंतर मात्र वळण मार्गाने पुढे गेल्यानंतर आकापूरच्या दिशेने असलेल्या बेरीकेटला धडक मारल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अपघातग्रस्त दुचाकी भरधाव असावी. अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे मार्गावरील वळण मार्ग अपघातप्रवण असल्याने सदर ठिकाणी आजपर्यन्त अनेक अपघात घडली असुन अनेकांनी जीवही गमावला. परंतु पोलीस प्रसासनाने जेव्हा पासून सदर अपघातप्रवण वळण मार्गाच्या दोन्ही बाजुला बेरीकेट लावले तेव्हापासून एकही अपघात घडलेला नाही. हे विशेष.
श्री दुर्गा मातायै नमः
शारदीय नवरात्री दुसरा दिवस
॥ माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ॥
आदिशक्तीच्या आराधनेचा हा मंगलमय उत्सव भक्ती, श्रद्धा, संयम आणि साधनेचा...
श्री दुर्गा मातायै नमः
शारदीय नवरात्री दुसरा दिवस
॥ माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ॥
आदिशक्तीच्या आराधनेचा हा मंगलमय उत्सव भक्ती, श्रद्धा, संयम आणि साधनेचा...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.