0
8

श्री दुर्गा मातायै नमः

शारदीय नवरात्री दुसरा दिवस
॥ माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ॥
आदिशक्तीच्या आराधनेचा हा मंगलमय उत्सव भक्ती, श्रद्धा, संयम आणि साधनेचा दिव्य संदेश घेऊन आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करते, नवरात्रीच्या दुस-या दिवशी आपण माँ दुर्गेच्या द्वितीय स्वरूप असलेल्या माँ ब्रह्मचारिणी देवीची भक्तिभावाने पूजा.अर्चना करते.

माँ ब्रह्मचारिणीचे महात्म्य
माँ ब्रह्मचारिणी हे तप, त्याग, संयम, दृढनिश्चय आणि अखंड भक्तीची प्रतीक आहे. भगवान शिवांना पतीरूपाने प्राप्त करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली, त्यांच्या या दिव्य तपोबलातून संपूर्ण जगाला निष्ठा, धैर्य आणि आत्मसंयमाचा महान संदेश मिळते, आजच्या शुभदिनी श्री माॅ दुर्गा मंदिर मूल येथे विराजीत माॅ दुर्गा देवी माॅ ब्रम्हचारीणीच्या स्वरूपात शुभ्र धवल (पांढरे) वस्त्र धारण करून भक्तांना दर्शन देत आहे. माध्यान्ह भोजन काळात साखरेचा नैवेद्य आज माॅ ब्रम्हचारीणीला दिला जाणार आहे.

हे जगज्जननी माँ ब्रह्मचारिणी आमच्या मनात भक्तीचा दीप अखंड तेवत ठेव, शुध्द मन, श्रध्दा आणि भावना ठेवुन पुजाअर्चना करणा-या समस्त भक्तांना सद्बुद्धीची दिशा दे, आणि प्रत्येक संकटावर मात करण्याचे धैर्य, शक्ती व सामर्थ्य आम्हाला प्रदान करए  सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव ठेव आणि सर्वांचे जीवन सुख, शांती, आरोग्य व आनंदाने परिपूर्ण कर. ही मनोभावे प्रार्थना…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.