Home Breaking News गांधी चौक स्थित मोबाईल शॉपीला आग. लाखोचे नुकसान

गांधी चौक स्थित मोबाईल शॉपीला आग. लाखोचे नुकसान

0
13

मूल : स्थानिक गांधी चौकस्थित मुख्य रहदारीच्या मार्गालगत असलेल्या ईलाईट मोबाईल शाॅपीला अचानक आग लागल्याने लाखोचे नुकसान झाल्याची घटना मूल शहरात घडली. सकाळी 9.30 वाजताचे सुमारास दुकानाच्या वरच्या माळयामधुन धुर निघत असल्याचे नागरीकांना दिसले. दुकानाच्या वरच्या माळयावरून धुर निघत असल्याची माहिती मिळताच अनेकांनी दुकानाकडे धाव घेवुन काच फोडून आग विझवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान माहिती मिळताच शाॅपीचे संचालकही घटनास्थळी पोहोचले. नगर परिषदेच्या अग्नीशमन पथकाला पाचारण करून आग विझवण्याचे प्रयत्न केल्यानंतर तब्बल एका तासाने आग विझविण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार शाॅर्ट सर्किटमुळे दुकानाच्या वरच्या माळयावर आग लागल्याची माहिती आहे. दुकानाचा वरचा माळा शाॅपी संचालक गोडावुन म्हणुन वापरत असल्याने त्याठिकाणी मोठया प्रमाणांत महागडे मोबाईल आणि मोबाईल संबंधीत महागडया वस्तु ठेवलेल्या होत्या. आग लवकर आटोक्यात आल्याने शॉपीचा खालचा माळा सुरक्षित राहिला. त्यामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी लागलेल्या आगीत शाॅपी संचालकाचे लाखोचे नुकसान झाल्याची शंका वर्तविल्या जात आहे. नुकसानीचा आकळा अजुन समजला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.