Home Breaking News श्री माँ दुर्गा मंदिर मूल येथे नवरात्री महोत्सवाचे आयोजन, नियमित आरतीला होते...

श्री माँ दुर्गा मंदिर मूल येथे नवरात्री महोत्सवाचे आयोजन, नियमित आरतीला होते महिलांची गर्दी

0
9

मूल : श्री माॅ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने संचलन केल्या जात असलेल्या स्थानिक श्री माॅ दुर्गा मंदीर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवरात्री व दांडीया महोत्सव साजरा केल्या जात आहे. मंदिर सेवा समितीचे सहसचिव केदारनाथ कोटगले आणि संध्या कोटगले यांचे हस्ते विधीवत पुजन करून घट स्थापीत करण्यांत आले. नवरात्रीच्या दरम्यान दररोज सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता श्री माॅ दुर्गा देवीची महाआरती होत असुन महाआरतीला शहरातील आबाल महिला पुरूषासंह बालगोपालांची प्रचंड गर्दी असते. संध्याकाळी 8 वाजतापासुन रात्रौ 10 वाजतापर्यंत दररोज गरबा दांडीया महोत्सवात शहरातील महिला, युवती आणि युवावर्ग मोठया संख्येनी सहभागी होवुन गरबा नृत्याचे सादरीकरण करीत आहेत. गरबा दांडीया महोत्सवाचे काळात उत्कृष्ठ वेषभुषा आणि नृत्य सादर करणा-या पंधरा जणांना दररोज नरगसेवक रितीक दिनेश गोयल आणि युवा उद्योजक निर हिरेण शहा यांचे कडुन आकर्षक भेट वस्तु दिल्या जात असल्याने गरबा दांडीया महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अष्टमीला खुला गरबा दांडीया महोत्सव होणार असुन नवमीला नवदुर्गा मातेच्या रूपांचे सादरीकरण करण्यांत येणार आहे. यावर्षी राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने दुर्गा मंदिर सेवा समितीच्या वतीने दरवर्षी होणारी गरबा दांडीया नृत्य स्पर्धा आणि माॅ दुर्गा देवी जागरण कार्यक्रम स्थगीत करण्यांत आले असुन यापोटी शिल्लक राहणारी रक्कम दुष्काळग्रस्ताचा मदतीला देण्याची घोषणा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. नवरात्री महोत्सवाच्या पंचमीच्या दिवशी भवराळा येथील महिलांचे भजन आणि नवमीला गुरूदेव भजन मंडळ निफंद्रा याचे भजन आणि गोपालकाल्याचे आयोजन करण्यांत आले आहे. विजयादशमीला श्री माॅ दुर्गा देवीला सोने अर्पण केल्यानंतर 21 आॅक्टोबर रोजी नवरात्री महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यांत येणार आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समितीच्या वतीने लक्की ड्रा चे आयोजन करण्यांत आले असुन 100 रूपयाच्या एका कुपनवर विविध आकर्षक वस्तु नागरीकांना उपलब्ध होणार आहे. मंदिर सेवा समितीच्या वतीने संपन्न होत असलेला गरबा दांडीया महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मंदिर समितीचे समस्त पदाधिकारी आणि दुर्गा माॅ सेवा समितीचे समस्त पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.