मूल : धाब्यावरून जेवन आटोपुन घरी परत येत असतांना झालेल्या अपघाता मध्यें एकाचा मृत्यु तर तिघेजन जखमी झाल्याची घटना मूल शहरात घडली. मूल गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर मूल पासुन 2 कि.मी. अंतरावर असलेल्या वळण मार्गावर स्कोडा क्र. एमएच-31-1857 चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले. त्या. त्यामुळे सदर वाहण मार्गालगतच्या शेतात जावुन पडले. झालेल्या अपघातात मंगेश रोडे नामक युवकाचा मृत्यु झाला तर वाहण चालक सावन बुटे, प्रणय शिरपुरे आणि राहुल आगबत्तनवार हे जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरीकांनी जखमींना वाहणा मधुन काढुन प्राथमिक उपचारा करीता स्थानिक उपजिल्हा रूग्णालय येथे हलविले. त्यानंतर जखमींची परिस्थिती लक्षात घेवुन योग्य उपचाराकरीता चंद्रपुर येथे हलविले, दरम्यान उपचाराकरीता नेत असतांनाच मंगेश रोडे यांचा मृत्यु झाला. रविवार असल्याने चौघेही मित्र नागपूर मार्गावरील एस.के.धाबा येथे जेवन करण्यास गेले होते. जेवन आटोपुन घरी परत येत असतांना रात्रो अंदाजे 11 वाजताचे सुमारास सदर अपघात घडला. अपघातामध्यें जखमी झालेले सावन बुटे आणि प्रणय शिरपुरे हे सनदी लेखापाल (सी.ए.) आहेत तर राहुल आगबत्त्नवार यांचे स्थानिक गांधी चौकात इलाईट मोबाईल शाॅपी आहे. सध्या जखमी तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे
श्री दुर्गा मातायै नमः
शारदीय नवरात्री दुसरा दिवस
॥ माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ॥
आदिशक्तीच्या आराधनेचा हा मंगलमय उत्सव भक्ती, श्रद्धा, संयम आणि साधनेचा...
श्री दुर्गा मातायै नमः
शारदीय नवरात्री दुसरा दिवस
॥ माँ ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ॥
आदिशक्तीच्या आराधनेचा हा मंगलमय उत्सव भक्ती, श्रद्धा, संयम आणि साधनेचा...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.