Home Breaking News मन की बात साठी अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर हयांना उपस्थितीचे निर्देश...

मन की बात साठी अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर हयांना उपस्थितीचे निर्देश ! भाजपा शहराध्यक्षांच्या पत्राची बीडीओंकडून दखल

0
13

मूल : पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी उपस्थित राहावे, म्हणुन भाजपा शहराध्यक्ष यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना लेखी पत्र दिल्याची बाब समोर आली असून सदर पत्राची दखल घेत संवर्ग विकास अधिकारी हयांनी संबंधीत विभाग प्रमुखांना मन की बात कार्यक्रमाला कर्मचा-यांना उपस्थित राहण्याबाबत निर्देश दयावे. असे लेखी पत्र दिल्याने संवर्ग विकास अधिका-याच्या कार्यपद्धतीवर प्रशासकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

राजकिय पक्षाच्या प्रभाव आणि देखरेखीत प्रशासनाचे संचलन होत असल्याची संधी साधुन शासकिय कामाच्या नांवाखाली राजकिय दृष्टीकोन बाळगुन प्रशासनाचा वापर केल्या जात असल्याच्या घटना घडत असतांना अलीकडेच एक घटना उजेडात आली आहे. 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालय मूल येथे मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे. सदर कार्यक्रमाला पंचायत समिती मूल अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर हयांनी उपस्थित राहावे. अशी विनंती भाजपाचे मूल शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली. त्यामुळे सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले. हे निश्चित. असे असताना भाजपच्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या पत्राची तातडीने दखल घेत संवर्ग विकास अधिकारी किशोर शिंदे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि तालुका वैद्यकिय अधिकारी यांना लेखी आदेश देत अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर यांना 27 सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहण्या संबंधी आपल्या स्तरावरून सुचना देवुन तसा अहवाल सादर करण्याचे कळविले. संवर्ग विकास अधिका-यांच्या पत्रानुषंगाने संबंधीत विभाग प्रमुखांनी कार्यवाही सुरू करताच तालुक्यातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेवीका मध्यें चर्चेला उधाण आले. सहा दिवसाच्या नियमित सेवेनंतर सुट्टीच्या (रविवार) दिवशी कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याचे नियोजन करीत असतांना मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश मिडाल्याने नाराजी व्यक्त करण्यांत येत आहे. कार्यक्रम पंतप्रधानांचा असला तरी आयोजन भाजपाने केल्याने सदर कार्यक्रम राजकिय असणार आहे, त्यामुळे राजकिय पक्षाच्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला शासकिय सेवा बजावणा-या महिला कर्मचा-यांना उपस्थित राहण्यासंबंधी निर्देश देणे संयुक्तीक नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी अथवा राजकीय पदाधिका-यांकडून प्रशासनाकडे जनहिताच्या मागण्या मांडणे ही बाब वेगळीे. मात्र शासकीय कर्मचा-यांनी अमुक कार्यक्रमाला उपस्थित राहीलेच पाहिजे. अश्या प्रकारची विनंती सक्षम अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे होती, परंतु राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने शासकीय अधिका-याला पत्र देऊन कर्मचा-यांना कार्यक्रमासाठी उपस्थित ठेवण्याची मागणी करणे आणि त्या पत्राच्या आधारे प्रशासनाकडून पुढील निर्देश दिले जाणे, हा प्रशासकीय शिष्टाचाराचा तसेच अधिकारांच्या मर्यादेचा उल्लंघन असल्याची कर्मचारीवृंदात चर्चा आहे.

मन की बात या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर यांची उपस्थिती आवश्यक होती तर त्याबाबतचे आदेश आमदार यांचे मार्फतीने संबंधित अधिका-याने दिले असते तर त्याला प्रशासकिय प्रक्रियेचा आधार राहीला असता. परंतु राजकीय पक्षाच्या पदाधिका-याने प्रशासनाला पत्र देऊन कर्मचा-यांना उपस्थित राहण्यासंबंधीची मागणी म्हणजे दबावतंत्राचा भाग
हिमाणी दशरथ वाकुळकर, माजी सरपंच, नांदगांव

मन की बात हा कार्यक्रम शासकिय योजनांचा प्रचार आणि प्रसार करणारा जनहिताचा आहे, अंगणवाडी सेवीका आणि आशा वर्कर हया शासन आणि जनता यांचे मधील दुवा आहेत, त्यांचे मार्फतीने शासकिय योजनाचा प्रचार आणि प्रसार तात्काळ आणि सुलभ होवु शकतो हे लक्षात घेवुन त्यांना योजनांची माहिती व्हावी. या उद्देशाने उपस्थिती संबंधी निर्देश दिले.

कीशोर शिंदे, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.