Home सामाजिक सहकार आयुक्ताच्या भूमिके मुळे पिग्मी एजेंट आणि पत संस्था संभ्रमात

सहकार आयुक्ताच्या भूमिके मुळे पिग्मी एजेंट आणि पत संस्था संभ्रमात

0
11

मूल : दारात जावून दैनिक बचत ठेव गोळा करणा-या अभिकर्त्याच्या विनंतीची दखल घेवून सहकार आयुक्तालयाने कमीशनच्या टक्यात वाढ करण्याचे निर्देश देवून पिग्मी एजंला खुश केले असले तरी दुसरी कडे मात्र आर्थिक स्थितीचा विचार करून कमीशनचा दर वाढवावा. असे निर्देश देवून पत संस्थेला अभय दिल्याने पिग्मी एजंट संभ्रमात सापडले आहे.

राज्याचे सहकार आयुक्त तथा निबंधक दिपक तावरे यांनी नुकतेच परिपत्रक वितरीत केले असून दैनिक बचत ठेव गोळा करणा-या अभिकर्त्यांना पत संस्थेकडून दिल्या जाणारे कमीशन अडीच टक्क्यावरून तीन टक्के केले. यापूर्वी 30 मार्च 2026 च्या परिपत्रका नुसार हे कमीशन अडीच टक्के करण्यांत आले होते. ही बाब अन्यायकारक वाटल्याने याविरूध्द दैनिक बचत ठेव गोळा करणा-या पिग्मी एजंटनी आक्षेप घेतला होता. पिग्मी एजंटच्या आक्षेपाची दखल घेत सहकार आयुक्त यांनी 12 जून रोजी पतसंस्था फेडरेशनची बैठक घेवून पिग्मी एजंटला दिला जाणारे अडीच टक्के कमीशन यापुढे तीन टक्क्या प्रमाणे देण्यांत यावे. असे निर्देश दिले आहे. नवीन निर्देशानुसार कमीशनची मर्यादा तीन टक्के केली असली तरी पतसंस्थांनी आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांचे स्तरावर कमीशनचा दर ठरवावा. असे स्पष्ट केल्याने कमीशनच्या टक्का वाढवायचा किंवा नाही, याविषयी पतसंस्था संभ्रमात सापडल्या आहेत. कमीशनच्या टक्क्याविषयी सहकार आयुक्त यांनी पिग्मी एजंटची विनंती मान्य केली असली तरी दुसरीकडे मात्र त्यांना तेवढा कमीशन दयायचा किंवा नाही, असे त्या त्या पतसंस्थेला ठरवायचे असल्याने सुखावलेले पिग्मी एजंट पुन्हा दुःखावल्याचे दिसून येत आहे. पत संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम ठेवण्यासाठी पिग्मी एजंज कश्याचीही तमा न करता दररोज घरी-दारी फिरून दैनिक बचत ठेवी गोळा करीत असतात. असे करतांना त्यांना अनेक त्रास सहन करावा लागतो, त्यामूळे पिग्मी एजंटच्या कष्टाची दखल घेवून पतसंस्थांनी त्यांना दिल्या जाणारे अडीच टक्के कमीशन तीन टक्के करून त्यांना दिलासा दयावा. अशी त्यांची मागणी होती. सदर मागणीची सहकार आयुक्त यांनी दखल घेतली असली तरी दुसरी कडे मात्र निर्णयाचा चेंडु पतसंस्थेकडे टोलविला. त्यामूळे पिग्मी एजंट पुन्हा संकटात सापडले आहे. सहकार आयुक्ताचा हा निर्णय म्हणजे श्रेयाचे फुल स्वतःकडे घ्यायचे आणि जबाबदारीचे काटे मात्र दुस-यांकडे सोपवुन हात झटकणारी असल्याचा आरोप तालुक्यातील पिग्मी एजंटनी केला असुन सदर परिपत्रकाचा फेरविचार करावा. अशी मागणी केली आहे.

पिग्मी एजंटचे परिश्रम लक्षात घेवून शासनाने घेतलेल्या कमीशन वाढविण्याचा निर्णयाचे स्वागत करून तालुक्यातील पतसंस्थांनी पिग्मी एजंटच्या हिताचा निर्णय घेवून सहकार्य करावे.
गुलाबखाॅ पठाण
पिग्मी एजंट तथा नगरसेवक मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.