मूल : नदी पाञामधुन रेती उपसा करण्याची मुदत नियम आणि अटी नुसार संपल्यानंतरही राञौची संधी साधुन नदी पाञामधुन रेतीचा उपसा करीत असतांना महसुल प्रशासनाने तीन हायवासह एक पोकलँण्ड ताब्यात घेतल्याने रेती कंञाटदारांचे धाबे दणाणले आहे.
अवैध रेती उपसा करून वाहतुक केल्या जात असल्याच्या गुप्त माहीतीच्या आधारे महसूल प्रशासनाच्या गौण खनिज पथकाने सापळा रचुन,सदर कारवाई केली. मध्यरात्री नंतर केलेल्या धडक कारवाईत चंद्रपूर तालुक्यातील रेती माफीया असलेल्या एका काँग्रेस नेत्याचे चार वाहने ताब्यात घेतल्याने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडुन दबावातंञाचा वापर केल्या जात असल्याची चर्चा आहे. राजोली व डोंगरगाव परिसरात एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीची चर्चा सुरू आहे. महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने तहसिलदार मृदुला मोरे यांचे मार्गदर्शनात रात्री १.३८ वाजताच्या सुमारास राजोली रेती घाट परिसरात कारवाई करत गोंडपिपरी येथील गायकवाड यांच्या मालकीचे पोकलँड मशीन (क्र. PUNGD20AJR- 3424734) ताब्यात घेतली. याचवेळी हायवा क्र. MH-34-CV 3155 हे वाहन राजोली रेती घाट परिसरातून पकडण्यात आले. तसेच हायवा क्र. MH-34-CQ-6755 हे वाहन डोंगरगाव-भादुर्णी मार्गावर तर हायवा क्र. MH-34-CV-4955 हे वाहन डोंगरगाव-राजोली रेती साठा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. हे तिनही हायवा काँग्रेस नेते श्यामकांत थेरे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. सदरची कारवाई मंडळ अधिकारी राजेंद्र नन्नावरे आणि दिपक गोहणे यांच्या मार्गदर्शनात तलाठी शंकर पिदुरकर, महेश पेंदोर, आकाश कन्नाके आणि व्यंकटेश जोशी यांनी केली. महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना महसूल विभागाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान महसुल प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली असली तरी रेती चोरी बाबत अद्याप पोलीसात तक्रार करण्यात न आल्याने वेगळी चर्चा कानावर येत आहे.महसूल विभागाच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणारे चांगलेच धास्तावले आहेत.









