Home Crime काॅंग्रेस पदाधिका-यासाठी भाजप नेत्याची फिल्डींग, अवैद्य रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणात शंकेला...

काॅंग्रेस पदाधिका-यासाठी भाजप नेत्याची फिल्डींग, अवैद्य रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणात शंकेला वाव

0
10

मूल : रेती उत्नखननाची मुदत संपल्यानंतरही नदी पात्रामधुन रेती उत्खनन करून वाहतुक करीत असतांना महसुल प्रशासनाने तीन हायवा एक पोकलॅण्ड ताब्यात घेवुन पाच दिवस झाले. परंतू आजपर्यंत संबंधीताविरूध्द पोलीस कारवाई न झाल्याने सदर प्रकरणात अर्थकारण झाल्याची चर्चा असून सदर प्रकरणात गोवलेल्या काॅंग्रेस पदाधिका-याच्या मदतीला भाजपच्या नेत्यांनी फिल्डींग लावल्याचे बोलल्या जात आहे.

तालुक्यातील राजोली आणि डोंगरगांव परिसरात रेती उत्खनाची मुदत संपल्यानंतर अवैद्यरित्या रेती उत्खनन करून वाहतुक केल्याचे कारणावरून स्थानिक महसुल अधिका-यांनी पाच दिवसांपूर्वी रात्रो 1.38 मिनीटांनी तीन हायवासह एक पोकलॅण्ड ताब्यात घेतली. केलेल्या कार्यवाही नंतर घटनेतील संबंधीत व्यक्तीला नोटीस बजावण्यांत आले असून त्यांचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यांत येईल. असे सांगीतल्या जात आहे. असे असले तरी संबंधीताविरूध्द महाराष्ट्र जमीन महसुल संहीता 1966 च्या कलम 48 (7) आणि (8) नुसार रेतीच्या बाजारभावाच्या पाच पट दंड आणि राॅयल्टी वसुल करण्याची कार्यवाही सोबतचं चोरीच्या उद्देशाने शासकिय संपत्ती असलेल्या रेतीचे विना परवानगी उत्खनन करून वाहतुक केल्याचे कारणावरून संबंधीता विरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 303 (2) अन्वये फौजदारी कारवाई होणे अपेक्षीत आहे. परंतु सदर घटना होवून आज पाच दिवस झाले, आजपर्यंत महसुल प्रशासनाने सदर घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविलेले नाही, त्यामूळे घटनेविषयी शंका व्यक्त केल्या जात आहे. यापूर्वी अश्या प्रकारच्या अनेक प्रकरणात तत्कालीन महसुल अधिका-यांनी पोलीस कारवाया केल्याने त्यावेळेस रेती माफीयांवर चांगलाच वचक बसला होता. परंतू वर्तमान महसुल प्रशासनाने अवैद्य रेती उत्खनन आणि वाहतुक केल्याचे कारणावरून काॅंग्रेस पदाधिकारी श्यामकांत थेरे यांचे विरूध्द फौजदारी कारवाईची प्रक्रिया न केल्याने सदर प्रकरणात अर्थकारण होत असल्याची चर्चा असून काॅंग्रेसच्या नेत्यांशिवाय भाजपाचा एक दिग्गज नेताही श्यामकांत थेरे यांचे करीता अधिका-यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामूळे सदर प्रकरणाविषयी आश्चर्च व्यक्त केल्या जात असून सदर प्रकरण कोणते वळण घेते याकडे रेती व्यावसायीकांचे लक्ष लागले आहे.

सदर घटनेविषयी प्रभारी तहसिलदार विजय पंडीले यांना विचारले असता त्यांनी घटनेविषयी संबंधीतांना सुचना पत्र दिले असून त्यांचे लेखी म्हणणे प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यांत येईल. असे सांगीतले. ठाणेदार विजय राठोड यांनी महसुल विभागाने तक्रार दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यांत येईल. असे सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.