मूल : मणुष्याच्या शेवटच्या प्रवासाचे ठिकाण म्हणजे मोक्षधाम. त्यामुळे मणुष्याचा शेवटचा प्रवास सुखमय व्हावा. अशी आप्तस्वकीयांची इच्छा असते. माञ लाखो रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या येथील मोक्षधामची दुरावस्था झाल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जीवन जगतांना मणुष्याने सुखासोबतचं यातनाही सहन केल्या, त्यामुळे मृत्युनंतर मणुष्याच्या वाट्याला यातना येवु नये, दाह संस्कार उत्तम आणि पध्दतीने पार पाडता यावे म्हणुन काही वर्षापुर्वी नगर परीषदेने सार्वजनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन कंञाटदारा मार्फत मोक्षधामाचे बांधकाम केले. नदीकाठावर, मोठ्या वृक्षाच्या सानिध्यात बांधण्यात आलेल्या मोक्षधामात भगवान शंकराची भली मोठी मुर्ती असुन विश्रांती सोबतच शौकसभा घेण्यासाठी दोन खुले सभागृह आणि दाह संस्कारासाठी दोन वेगवेगळे निवारे तयार करण्यात आले आहे. निर्माण करण्यात आलेल्या या वास्तुकडे नगर परीषदेचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रूपये खर्चुन बांधण्यात आलेले मोक्षधाम गैरसोयीचे झाले असुन भगवान शंकराची मुर्ती धुळीने माखली आहे. दाह संस्कार करण्याच्या दोन्ही निवा-यामध्ये तीन फुट खोल, चार फुट रूंद आणि पाच फुट लांब खड्डे पडले असुन सरण रचण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणुन उभारलेले लोखंडी कठडे चोरीस गेलेले आहे. त्यामुळे दाहसंस्काराचे ठिकाणी पार्थीवावर दाहसंस्कार करायचे कसे ? पार्थीव ठेवायचा कसा ? असे प्रश्न नातेवाईकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव निवा-याच्या बाजुला सपाट जागेवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडावे लागत आहे. नियमित सफाई होत नसल्याने सफाईचा अभाव असुन पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने नातेवाईकांना पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. पविञ जागा म्हणुन ओडखल्या जाणारे लाखो रूपये खर्चुन बांधण्यात आलेले येथील मोक्षधाम नगर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बकाल झाले आहे. मणुष्याचा शेवटचा प्रवास सन्मानाने होण्यासाठी नगर प्रशासनाने लक्ष देवुन मोक्षधामची सुधारणा करून मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांप्रति संवेदनशीलता जपण्याचे सत्कार्य करून निवडणुकीत दिलेल्या वचनाची पुर्तता करावी, अन्यथा “चोर चोर मावस भाऊ, आपण सारे वाटून खाऊ” म्हणण्याची पाळी नागरीकांवर येईल असं होवु नये, तूर्त एवढीच अपेक्षा आहे.









