मूल : गोंडी विहिरगांव परिसरातील सरकारी जमीन व्यक्तीगत मालकीची असल्याचे सांगुन बेकायदेशीर खरेदी विक्री झालेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधीताविरूध्द कार्यवाही करावी, अशी मागणी भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांनी केली आहे.
मूल शहरालगत असलेल्या गोंडी विहिरगांव परिसरातील भु.क्र. 96 आराजी 0.35 आर. ही जमीन शासकिय दस्तऐवजात सरकारी वन अशी नोंद आहे. असे असतांना सदर सरकारी जमीनीच्या लगत असलेल्या शेतमालकाने शेतीलगत असलेली सरकारी जमीन स्वमालकीची असल्याचे सांगुन 100 रूपयाचे स्टॅम्प पेपरवर विक्री केली. खरेदी विक्री पत्राद्वारे सदर जमीनीचा व्यवहार झाल्यानंतर जमीन खरेदी केलेल्या व्यक्तीने सदर जमीनीवर परवानगी न घेता सिमेंटचे पक्के बांधकाम सुरू केले असुन सरकारी वन अशी नोंद असलेली जमीन स्वतःच्या नांवावर करण्याचे प्रयत्न चालविले आहे. सदर प्रकार बेकायदेशीर असून फौजदारी गुन्हयास पात्र असल्याने सरकारी वनजमीनीचा व्यवहार करणा-याविरूध्द कार्यवाही करावी. अशी मागणी सुरज मांदाडे यांनी तहसिलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडे केली आहे. भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांच्या तक्रारी नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सदर जमीन ही वनविभागाची नसल्याचे सांगीतले मात्र तहसिलदार मृदुला मोरे यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्यांत येत असुन चौकशीत दोष निष्पन्न झाल्यास संबंधीताविरूध्द योग्य कार्यवाही करण्यात येईल. असे सांगितले त्यामुळे सदर प्रकरण कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे.
मूल : मृत्यु अटळ असला तरी मृत्युनंतर अवयवदान करून एखादया गरजू रुग्णांना नवजीवन देवु शकु, ही सामाजिक बांधीलकी जोपासुन सत्तरी पार केलेल्या दोन मित्रांनी...
मूल : जानेवारी 2025 मध्यें प्रशासकिय मान्यता मिळालेल्या महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक निर्मितीचा मुद्दा शहरात चर्चेचा झाला आहे.
शहराचे मध्यवर्ती...
मूल : अवैद्य उत्खनन आणि वाहतुक प्रकरणात तीन हायवा आणि एका पोकलेन मशीन मालकांविरूध्द ठोस कार्यवाही न करता नाममात्र कार्यवाही केल्याने सदर प्रकरणात अर्थकारणासोबतचं...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.