समाजातील रंजले-गांजले, निराधार, निराश्रीत आणि दुर्लक्षित व्यक्तीच्या हितासाठी काम करण्याची जिद्द, महिलांच्या सक्षमीकरणाची तळमळ आणि शिक्षणामधुन परिवर्तन घडविण्याचा ध्यास घेऊन नलिनी आडपवार यांनी आपल्या सामाजिक प्रवासाची सुरुवात केली.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्यामधुन त्यांच्या सामाजिक कार्याला प्रारंभ झाला. शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम, या विचारातून त्यांनी अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. यानंतर श्रमिक एल्गारच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर काम केले. मूल शहरातील महिलांना एकत्र आणून बचत गटांची मजबूत बांधणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. बचतीसोबतच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आणि अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या नलिनी आडपवार सध्या मूल शहर महीला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याची शिदोरी, जनसंपर्क, नम्र स्वभाव आणि मायेच्या बोलण्यावर वेगळी ओळख निर्माण केली असुन नलीनीताई म्हणजे भगिनींचा गोतावळा. असे समिकरण निर्माण झाले आहे.
मूल नगर परिषद निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात नगर सेविका म्हणून निवडून येण्याचा सन्मान मिळविला असुन कर्तव्यदक्ष नगर सेवक म्हणुन त्यांनी आपले कार्ये आणि जबाबदारीला सुरुवात केली आहे. सध्या त्या मूल नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून कार्यरत असून महिला आणि बालकांचे हित, प्रगती आणि कल्याणासाठी संवेदनशीलतेने काम करत असुन भगिनी आणि बालकांची सेवा हेच त्यांचे धोरण आहे. विशेषतः एकल महिलांच्या समस्या, त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याची त्यांची इच्छा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आधार देण्याचा त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. सौ. नलिनीताई आडपवार यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून सामाजिक जाणीव, संघर्ष आणि सेवाभाव यांचा प्रेरणादायी आदर्श आहे. अश्या या मितभाषी, नम्र स्वभावाच्या, महीला आणि बालकाच्या हितासाठी सदैव जागरूक राहणाऱ्या सौ. नलीनीताई आडपवार ह्यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यासाठी मूल टुडे तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. माँ दुर्गा त्यांना शक्ती, युक्ती आणि बळ देवो. ही प्रार्थना.
मूल : अनधिकृत बॅनर आणि होर्डिग्ज कडे दुर्लक्ष करणा-या नगर प्रशासनाला कुत्र्याच्या वाढदिवसा निमित्य लावलेल्या शुभेच्छा बॅनरने जागे केले असून नगर प्रशासनाच्या परवानगी शिवाय...
मूल : गोंडी विहिरगांव परिसरातील सरकारी जमीन व्यक्तीगत मालकीची असल्याचे सांगुन बेकायदेशीर खरेदी विक्री झालेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधीताविरूध्द कार्यवाही करावी, अशी मागणी भाजयुमोचे...
मूल : विकास आणि सेवेची हमी देवून सत्तारूढ झालेल्या नगरसेवकांना निवडणुकपूर्व दिलेल्या वचननाम्याचा विसर पडला असून संभाव्य विकासकामांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने उर्वरीत...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.