Home Breaking News सत्तारूढ नगर सेवकांना तीस वचनांचा विसर, उर्वरित साडे चार वर्षा कडे जनतेचे...

सत्तारूढ नगर सेवकांना तीस वचनांचा विसर, उर्वरित साडे चार वर्षा कडे जनतेचे लक्ष

0
7

मूल : विकास आणि सेवेची हमी देवून सत्तारूढ झालेल्या नगरसेवकांना निवडणुकपूर्व दिलेल्या वचननाम्याचा विसर पडला असून संभाव्य विकासकामांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने उर्वरीत साडेचार वर्षाकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

2 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीपूर्वी सत्तारूढ झालेल्या काॅंग्रेसच्या उमेदवारांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नाल्यांची दुरुस्ती, सार्वजनिक सुविधा आदि आश्वासने देतांना छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचा वापर, प्रत्येक वार्डात सार्वजनिक नळांची व्यवस्था, प्रमुख चौकात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती, व्यावसायीकांना विनामुल्य कचरा पेटीचे वितरण, मोक्षधाम मध्यें माफक दरात लाकुड उपलब्ध, शासकिय जागेवर असलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी पाठपुरावा, असे एकुण तीस वचन पार पाडण्याचे जाहीर केले. आज सहा महिणे लोटुन गेले, मात्र दिलेल्या तीस कलमी वचननाम्यातील एकाही वचनाची पुर्तता करण्यास सत्तारूढ काॅंग्रेस नगरसेवक यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची दैनावस्था झाली आहे, फोडफाड आणि अस्वच्छ झालेले व्यापारी संकुल सुस्थितीत ठेवणे नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या शहरातील शेकडो बेरोजगारांना माफक दरात व्यापारी संकुलातील गाडे भाडे तत्वावर देणे सहज शक्य आहे. नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करणा-या या गंभीर विषयाचा निपटारा करण्यासाठी योग्य पाठपुरावा आणि सातत्य असणे गरजेचे आहे. परंतू पाहिजे त्या प्रमाणांत या विषयाकडे लक्ष दिल्या जात नसल्याने लाखो रूपये खर्चून बांधण्यांत आलेले व्यापारी संकुल शोभेचे ठरत आहे. लाखो रूपये खर्चून बांधण्यांत आलेल्या मोक्षधाम दुरावस्थेेत सापडले असून दाहसंस्काराचे स्थळी मोठे खड्डे पडले आहेत. पडलेले खड्डे बुजविण्यास एक दिवस आणि जेमतेम रूपये पुरेसे आहे. पण या बाबीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने अंत्यसंस्कारा करीता जाणा-या नागरीकांमध्यें संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, दाहसंस्काराचे ठिकाणचं दुरावस्थेत आहेत तर अंत्यसंस्काराकरीता लाकुड लाकुड पुरविणे दुरच दिसत आहे. पदभार सांभाळुन आज सहा महिणे झाले, परंतु अश्या अनेक आवश्यक समस्या आजही जैसे थे आहेत, शासकिय जागेवर असलेले नागरीकांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी वचनबध्द राहण्याचे आश्वासन दिलेले नगरसेवक अतिक्रमण हटविण्याच्या शर्यतीत आहेत, तत्कालीन पदाधिका-यांच्या काळात झालेला 28 कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे विद्यमान नगरसेवक लेखी तक्रार न करता तोंडाचे वाफारे सोडत आहेत. अनेक प्रभागातील नाल्यांची सफाई, घंटागाडीच्या अनियमितते विषयी माहिती असुनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने नगरसेवकांच्या कार्यपध्दती विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामूळे उर्वरीत साडे चार वर्षाच्या काळात दिलेल्या तीस कलमी वचनांची पुर्तता होईल, तुर्त एवढीच अपेक्षा शहरवासीय बाळगुन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.