मूल : अवैद्य उत्खनन आणि वाहतुक प्रकरणात तीन हायवा आणि एका पोकलेन मशीन मालकांविरूध्द ठोस कार्यवाही न करता नाममात्र कार्यवाही केल्याने सदर प्रकरणात अर्थकारणासोबतचं राजकारण झाले असावे. अशी शंका व्यक्त करण्यांत येत असून महसुल प्रशासन त्या रेती तस्कारांना अभय देत असल्याची चर्चा आहे.
दहा दिवसांपूर्वी राजोली रेती घाटावरून अवैद्य रेती उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे कारणावरून महसुल प्रशासनाच्या भरारी पथकाने काॅंग्रेस पदाधिकारी श्यामकांत थेरे यांच्या मालकीचे तीन हायवा आणि गोंडपिपरी येथील गायकवाड यांच्या मालकीची पोकलेन मशीन जप्त करून कारवाईची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देवुन वाहणाविषयी माहिती मागवतांना महसुल प्रशासनाने सदर प्रकरणाविषयी सात दिवसांचे आंत लेखी म्हणणे सादर करण्याची संधी दिली. त्यान्वये श्यामकांत थेरे यांनी लेखी म्हणणे सादर केल्याचे सांगण्यांत येते. सदर प्रकरणात थेरे यांनी सादर केलेले लेखी म्हणणे गृहीत धरून महसुल प्रशासनाने महाराष्ट्र जमीन महसुल संहीता 1966 च्या कलम 48 (7) आणि (8) नुसार कार्यवाही आरंभली असली तरी भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 303 (2) अन्वये फौजदारी कारवाई होणे अपेक्षीत आहे. परंतु घटना होवुन तब्बल दिवस होवुनही महसुल प्रशासनाने दोन्ही वाहणचालकांविरूध्द फौजदारी कार्यवाही होण्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामूळे सदर प्रकरणात अर्थकारणाशिवाय राजकारणही झाले असावे. अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे मूल तालुक्यात शामकांत थेरे यांच्या नावावर एकही अधिकृत रेती घाट नसताना रेतीचे अवैद्य उत्खनन करून विना परवाना वाहतुक तो कसा काय करीत होता ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मूल : मृत्यु अटळ असला तरी मृत्युनंतर अवयवदान करून एखादया गरजू रुग्णांना नवजीवन देवु शकु, ही सामाजिक बांधीलकी जोपासुन सत्तरी पार केलेल्या दोन मित्रांनी...
मूल : जानेवारी 2025 मध्यें प्रशासकिय मान्यता मिळालेल्या महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक निर्मितीचा मुद्दा शहरात चर्चेचा झाला आहे.
शहराचे मध्यवर्ती...
मूल : लोकशाहीचा पाया मजबुत ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत असणे आवश्यक असुन भविष्यात मतदारांनाही शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे,...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.