जनतेच्या हितासाठी शहरालगत मालधक्का होवू देणार नाही, आ. सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही

0
5

मूल : मूल शहरालगत रेल्वे मालधक्का निर्माण झाल्यास मालधक्क्याचा त्रास आणि प्रदुषणाला कंटाळून शहरातील अनेक कुटूंब अन्य शहराचा आधार घेतील. त्यामूळे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या मूल शहराची लोकसंख्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून शहरालगत कोणत्याही परिस्थितीत मालधक्का होऊ देणार नाही. अशी ग्वाही क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मालधक्का हटाव-शहर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रस्तावित मालधक्क्या विरोधात निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना मूल शहरालगत कोणत्याही परिस्थितीत रेल्वे मालधक्का होणार नाही. असे स्पष्ट मत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मागील काही दिवसांपासून मूल शहरालगत रेल्वे मालधक्का निर्माण व्हावा. म्हणून तालुक्यात स्वाक्षरी अभियान सुरू आहे. शहरालगत रेल्वे मालधक्का निर्माण झाल्यास नागरीकांना मोठया प्रमाणांत त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून शहरातील विविध संघटना आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी मालधक्का हटाव शहर बचाव कृती समितीची निर्मिती करून त्यामाध्यमातुन प्रस्तावित असलेल्या रेल्वे मालधक्याचा प्रखर विरोध केल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुल नगर परिषदेने शहरा लगत रेल्वे मालधक्का होवू नये, अश्या प्रकारची विरोधी भूमीका घेत नुकताच सर्वानुमते ठराव मंजुर केला. त्यामूळे संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला बळ मिळाले असून आमदार म्हणून आपणही संघर्ष समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहु. अशी ग्वाही देतांना या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांचेशी प्रत्यक्ष भेटून मालधक्क्याचा विरोध करणार असल्याचे सांगीतले. यावेळी संघर्ष समितीचे जीवन कोंतमवार यांनी चांदाफोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावर मूल पासून 5 कि.मी. अंतरावर केळझर येथे मालधक्का असतांना जाणीवपुर्वक मूल शहरालगत रेल्वे मालधक्का निर्माण करण्याचे प्रयत्न केल्या जात असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांचे निदर्शनास आणुन दिली. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अजय दुबे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचेसह संघर्ष समितीचे सदस्य तथा न.प.बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, ज्येष्ठ सदस्य जीवन कोंतमवार, भाग्यश्री नागरी सहकारी पत संस्थेचे संस्थापक अनिल मोगरे, पत्रकार विजय सिद्धावार, भोजराज गोवर्धन, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अँड. प्रणव वैरागडे, ख्रिस्ती समाज संघटनेचे अँड. अश्विन पाॅलीकर, कृउबास संचालक अमोल बच्चुवार, सामाजीक कार्यकर्ते महेश गाजुलवार, विवेक मांदाडे, शिवसेनेचे नितीन येरोजवार, आकाश कावळे, संदीप मोहबे, व्यापारी संघटनेचे श्रीकांत बुक्कावार, डेव्हीड खोब्रागडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here