गॅस एजन्सीविना असलेल्या मूल तालुक्यात गॅस सिलींडर करीता आंदोलनाची शक्यता

0
5

मूल : सावली आणि चिचपल्ली येथील गॅस एजन्सीकडून विशिष्ट दिवसांचा कालावधी पुर्ण होवूनही सिलींडर मिळत नसल्याने येत्या काळात तालुक्यात गॅस सिलींडर करीता आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता असून दिड लाख लोकसंख्येच्या मूल तालुक्यात बंद असलेली गॅस एजन्सी सुरू करून ग्राहकांना दिलासा दयावा. अशी मागणी होत आहे.

106 गावांचा समावेश असलेल्या मूल तालुक्यात आजस्थितीत 25 हजाराचे वर गॅस वापरणारे कुटूंब आहेत. तालुक्यातील गॅस वापरणा-या ग्राहकांची संख्या लक्षात घेवून शासनाच्या परवानगीने 2009 मध्यें मूल येथे हिेदुस्थान पेट्रोलीयमची गॅस एजन्सी सुरू झाली. मूल येथे एचपी गॅस एजन्सी सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील गॅस ग्राहकांना अन्य ठिकाणाहून गॅस सिलींडर आणावे लागत होते. परंतू 2009 पासून तालुक्यातील गॅस ग्राहकांना मूल येथून गॅस सिलींडर उपलब्ध होवू लागले. त्यामूळे तालुक्यातील गॅस वापरणा-या ग्राहकांची संख्या आपसुकच वाढली. वन्यप्राण्यांचे हल्ले आणि सरपणाच्या टंचाईमूळे तालुक्यातील हजारो गरीब कुटूंबही प्रधानमंत्री उज्वला योजना व शासनाच्या अन्य योजनां अंतर्गत मोफत आणि अनुदान तत्वावर गॅस सिलींडरचे लाभार्थी झाले. त्यामूळे सध्यास्थितीत मूल तालुक्यात 25 हजाराचे वर गॅस ग्राहक असून एकटया मूल शहरात साडे तीन हजाराहून जास्त ग्राहक आहेत. परंतू मागील काही महिण्यांपासून हजारोच्या संख्येने असलेले तालुक्यातील गॅस सिलींडर धारक गॅस एजन्सीविना त्रस्त आहेत. सुरळीत सुरू असलेल्या गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हिंदुस्थान पेट्रोलीयम कंपनीने येथील गॅस एजन्सी काही काळाकरीता बंद केली. तालुक्यात एकमेव असलेली संजय गॅस एजन्सी बंद केल्यानंतर तालुक्यातील हजारो गॅस ग्राहकांची गैरसोय होवू नये म्हणून मूल शहर आणि तालुक्यातील काही गांवातील गॅस सिलींडर धारकांना मूल पासून 12 कि.मी.अंतरावर असलेल्या सावली येथील रेयांश गॅस एजन्सी आणि काही गांवातील सिलींडर धारकांना 22 कि.मी. अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथील क्रिष्णा ग्रामीण गॅस एजन्सीला नेमुण दिलेल्या गावांतील गॅस ग्राहकांना सिलींडर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली. स्थानिक स्तरावर गॅस एजन्सी नसल्यामूळे मूल शहर आणि तालुक्यातील गॅस ग्राहकांना सध्यास्थितीत दुस-या गावांतील गॅस एजन्सीवर अवलंबुन राहावे लागत असल्यामूळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलींडर टंचाईचा सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात गॅस सिलींडरची तिव्र जाणवत आहे. मूल तालुक्यातील गॅस धारकांच्या मागणी नुसार गॅस कंपनी संबंधीत गॅस एजन्सीला गॅस सिलींडर पुरवठा करीत नसल्याने तालुक्यात गॅस सिलींडरची भिषण टंचाई जाणवत आहे. ठराविक दिवसांचा कालावधी पुर्ण होवूनही संबंधीत गॅस एजन्सी गॅस ग्राहकांना सिलींडर पुरवत नसल्याने मूल शहरातील अनेक घरांमधून धुरीचा लोट निघु लागला आहे. शेकडो गृहीणींनी विद्युत शेगळींचा तर अनेकांनी चुलीचा आधार घेवुन कुटूंबाची भुक भागवत आहेत. गृहीणींना होत असलेला त्रास कत्र्या पुरूषांना सहन होत नसल्याने येत्या काळात तिव्र आंदोलन केल्याशिवाय सुस्तावलेले प्रशासन जागे होणार नाही. अश्या संतप्त प्रतिक्रिया वार्डावार्डात उमटत आहे. त्यामूळे दिड लाख लोकसंख्येच्या मूल तालुक्यातील 25 हजार गॅस ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलींडर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने बंद असलेली गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून ग्राहकांना दिलासा दयावा. अशी मागणी होत आहे.

गॅस सिलींडर धारकांना विशिष्ट दिवसात सिलींडर उपलब्ध करून देणे कंपनीची जबाबदारी आहे. परंतू ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनी आणि प्रशासन अपयशी ठरत आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांना भेटुन गॅस ग्राहकांची समस्या दुर करण्याची विनंती केली. परंतु आजपर्यंत समस्येचे निराकरण झाले नसून दिवसेंदिवस समस्या गंभीर होत आहे. त्यामूळे गॅस धारकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने येत्या काही दिवसांत तिव्र आंदोलन करण्यांत येईल.
संतोषसिंह रावत,
प्रदेश सरचिटणीस, म.प्र.काॅ.कमेटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here