मूल – विशिष्ट मुदतीमध्यें विज बिलाचा भरणा न केल्यास विज पुरवठा खंडीत करणे ही विज वितरण कंपनीची कार्यप्रणाली आहे. त्याप्रमाणे नगर परिषदेने विज बिलाची थकीत रक्कम मुदतीमध्यें भरली नसावी म्हणून विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केला असावा. भाजपाच्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्यांनी विज पुरवठा खंडीत करण्यासंबंधी विज वितरण कंपनीच्या कोणत्याही अधिका-यास लेखी किंवा तोंडी सांगीतलेले नाही, जर असा पुरावा असल्यास नगर परिषदेच्या पदाधिका-यांनी तो सादर करावा. असे आवाहन भाजपा शहरअध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी दिले आहे.
स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना प्रविण मोहुर्ले यांनी पाणी पुरवठया संबंधीचे अपयश लपविण्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवक खोट बोलून जनतेची दिशाभुल करीत असल्याचा आरोप करतांना प्रविण मोहुर्ले यांनी नगराध्यक्ष एकता समर्थ आणि पदाधिका-यांनी केलेला राजकिय सुळबुध्दीने विज वितरण कंपनी नगर परिषदेचा विज पुरवठा खंडीत करीत असल्याचा आरोप निराधार असल्याचे मत व्यक्त केले. भाजपाच्या पंधरा वर्षाच्या सत्ताकाळात शहरवासियांना कधीही पाण्यासाठी त्रास झालेला नाही, परंतु काॅंग्रेसच्या अडीच महिण्याच्या कार्यकाळात जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे मत व्यक्त करतांना प्रविण मोहुर्ले यांनी निवडणुकपुर्व दिलेल्या वचननाम्यानुसार एकाही वचनाची पुर्तता आजपर्यंत केली नसल्याचा आरोप केला. प्रभाग क्र. 8 मध्ये एका रस्त्याच्या कामाकरीता विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे यांनी लाखो रूपयाचा निधी मंजुर केला. त्या निधी मधुन रस्त्याचे काम होणे अपेक्षीत होते परंतू पदाधिका-यांनी निवीदा प्रक्रियेत घोळ केल्याने मंजुर झालेला निधी आ. कायंदे यांना नामंजुर करावा लागल्याचे मत व्यक्त करतांना प्रविण मोहुर्ले यांनी पदाधिका-यांच्या अश्या कारभारामूळे शहराचा विकास होईल काय ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोतीलाल टहलियानी, माजी नगरसेवक अजय गोगुलवार, नगरसेवक अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार, भाजपा कार्यकर्ते दादाजी येरणे आदि उपस्थित होते.










