मूल : काॅंग्रेसच्या वर्चस्वातील वीस सदस्यीय मूल नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडी संबंधीची विशेष सभा नुकतीच पार पडली. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह वीस पैकी अठरा सदस्य निवडुन आणत मूल नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली. भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने नामनिर्देशित सदस्य पदावरही काॅंग्रेसच्या वतीने बंडु गुरनूले आणि गुलाबखाॅ पठाण यांची अविरोध निवड झाली. वीस पैकी अठरा जागांवर काॅंग्रेसने विजय संपादन केल्याने संख्याबळाच्या प्रमाणांत परिषदेच्या पाच विषय समितीच्या सभापती पदावर काॅंग्रेसचे वर्चस्व राहणार हे निर्विवाद सत्य होते. पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे उपस्थितीत आज पार पडलेल्या सभेला नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांचेसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. झालेल्या सभेत नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा गटनेते राकेश रत्नावार यांची आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती तर प्रशांत समर्थ यांची बांधकाम समितीच्या सभापती पदी वर्णी लागली. राकेश रत्नावार यांनी यापुर्वी उपाध्यक्ष आणि आरोग्य व स्वच्छता तसेच प्रशांत समर्थ यांनी बांधकाम समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळली होती. माजी नगरसेविका ललिता सुरेश फुलझेले यांची शिक्षण समितीच्या तर नगर परिषदेचे निवृत्त अधिक्षक विलास कागदेलवार यांची पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदावर निवड झाली. महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षा तथा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला चवळीत सक्रीय राहणा-या नलीनी आडपवार यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. समीक्षा कडस्कर महिला बालकल्याण समिती उपसभापती राहणार आहेत. निवडण्यांत आलेल्या पाचही समितीच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.
मूल : मृत्यु अटळ असला तरी मृत्युनंतर अवयवदान करून एखादया गरजू रुग्णांना नवजीवन देवु शकु, ही सामाजिक बांधीलकी जोपासुन सत्तरी पार केलेल्या दोन मित्रांनी...
मूल : जानेवारी 2025 मध्यें प्रशासकिय मान्यता मिळालेल्या महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक निर्मितीचा मुद्दा शहरात चर्चेचा झाला आहे.
शहराचे मध्यवर्ती...
मूल : अवैद्य उत्खनन आणि वाहतुक प्रकरणात तीन हायवा आणि एका पोकलेन मशीन मालकांविरूध्द ठोस कार्यवाही न करता नाममात्र कार्यवाही केल्याने सदर प्रकरणात अर्थकारणासोबतचं...
कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.