मूल : लोकशाहीचा पाया मजबुत ठेवण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत असणे आवश्यक असुन भविष्यात मतदारांनाही शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (एस.आय.आर.) अभियान सुरू केले आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी पात्र नागरिकांनी सहभागी होवून सहकार्य करावे. असे आवाहन काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी केले आहे.
लोकशाही प्रधान भारतात निवडणुक प्रक्रिया राबवितांना मतदानाचे प्रत्यक्ष दिवशी नांव, वय, वार्ड आदि कारणांमूळे मतदारांमध्यें गोंधळ निर्माण होवुन मतदार यादीत नांव नसल्याचे कारणावरून संबंधीत मतदार मतदानापासून वंचित राहतो. यासाठी मतदार आपली जबाबदारी विसरून त्यावेळी शासनाला जबाबदार ठरवुन मोकळा होतो. ही परिस्थिती लक्षात घेवून प्रत्येक नागरीकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावत येवून निवडणुक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासपुर्ण झाली पाहिजे. हा उद्देश समोर ठेवुन निवडणुक आयोगाने एस.आय.आर. अभियान सुरू केले आहे. निवडणुक आयोगामार्फत राबविण्यांत येत असलेल्या या अभियानात मतदारांनी पक्षभेद विसरून सहकार्य केले पाहिजे. भविष्यातला वेध घेवुन आपल्या नांवाची मतदार यादीत पडताळणी करावी, आपले नांव, वय, पत्ता यादी अचुक नोंद असल्याची खात्री करावी. चुकीची नोंद असल्यास दुरूस्ती संबंधी किंवा बदलाच्या नोंदी विषयी दारी आलेल्या कर्मचा-यास सुचीत करून लोकशाहीचा पाया मजबुत करण्यासाठी सहकार्य करणे प्रत्येक नागरीकांची जबाबदारी आहे. आयोगाच्या अभियानाची माहिती आपले नातेवाईक, मित्र मंडळी आणि निरक्षर व्यक्तींना देवून त्यांनाही एस.आय.आर. अभियानात सहभागी करून घेण्यासाठी स्वयःस्फुर्तीने सहकार्य करून नागरीकत्वाचे कर्तव्य पार पाडावे. असेही आवाहन संतोषसिंह रावत यांनी केले आहे. सदर अभियाना विषयी तक्रार किंवा समस्या असल्यास तहसिल कार्यालयातील निवडणुक विभागाशी किंवा कोणत्याही राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधुन मतदार यादीत अचुक नांवाची नोंद करून घ्यावी. अशी विनंतीही रावत यांनी केली आहे.
प्रत्येक निवडणुक निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगामार्फत राबविण्यांत येत असलेल्या एस.आय.आर. अभियानात सर्व पात्र नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कर्तव्य पार पाडावे.
मृदुला मोरे, तहसिलदार, मूल











