पोरेड्डीवार परिवारातील कर्तबगार तीन महिलांचे गाणली समाजाने केले अभिनंदन

0
3

मूल : नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीत सहकार महर्षी अरविंदसावकार पोरेड्डीवार गटाने बाजी मारली आहे. संचालक पदाच्या निवडणुकीत 21 संचालक अविरोध निर्वाचित झाल्यानंतर बुधवारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव पदाची निवडणुक पार पडली. पार पडलेल्या निवडणुकीत प्रथमचं एका महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. सहकार महर्षी अरविंदसावकार पोरेड्डीवार यांच्या स्नुषा आणि प्रंचितसावकार पोरेड्डीवार यांच्या सहचारीणी ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांची अध्यक्षपदावर अविरोध निवड झाली. बॅंकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या ईशा प्रंचित पोरेड्डीवार हया उच्चशिक्षीत असून त्यांनी बि.एस्सी. एम.बी.ए. (मानव संसाधन) तसेच कंपनी सेक्रेटरी (सीएस) यामध्यें पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले आहे. त्यामूळे त्यांना असलेला कायदेशीर अनुपालन, कार्पोरेट गव्हर्नन्स, कंपनीचे भागधारक, व्यवस्थापन व मानव संसाधन आदि बॅंकेच्या निगडीत असलेल्या महत्वपुर्ण विषयांचा चांगला अभ्यासाचा बॅंकेच्या प्रगतीसाठी लाभ होणार आहे. बॅंकेच्या निर्मितीपासून आजतागायत बॅंक व बॅंकेच्या ग्राहकांच्या हितासाठी पोरेड्डीवार परिवाराने महत्वपुर्ण भुमीका बजावली असून यापुढील काळात पोरेड्डीवार परिवारातील ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांचेसह सौ.छायाताई अरविंदसावकार पोरेड्डीवार आणि सौ. निलिमा प्रकाशसावकार पोरेड्डीवार हया दोन कर्तबगार महिला संचालक म्हणून अन्य सहकारी संचालक वृंदाच्या सहकार्याने बॅंकेचे व्यवस्थापन आणि कामकाज सांभाळणार आहे. याचा मूल आणि सावली शहरातील गानली समाजाला अभिमान असल्याने सावली गानली समाज, गानली रेड्डी समाज यांचेसह सावली येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाने पोरेड्डीवार परिवारातील तीनही महिलांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here