मूल : येत्या २० डिसेंबर रोजी मूल नगर परीषदेच्या प्रभाग १० मधील गट ब ची निवडणुक होत आहे. होवु घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपासह वंचित बहुजन आघाडीचे असे तीन उमेदवार नशीब अजमावत आहेत. नशीब अजमावत असलेल्या तीन उमेदवारांपैकी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल प्रेमलवार यांनी प्रभाग १० मधील श्री गणेश मंदीरात श्रीफळ फोडुन प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, नगर परीषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता समर्थ यांचेशिवाय काँग्रेस पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. २ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धानोरकर आणि संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वावार विश्वास ठेवुन ज्याप्रमाणे सर्वांनी सर्वतोपरी परीश्रम आणि सहकार्य केले त्याप्रमाणे प्रभाग १० च्या होवु घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल प्रेमलवार यांच्या विजयासाठी सर्वांनी परीश्रम घ्यावे. अशी विनंती राकेश रत्नावार आणि प्रशांत समर्थ यांनी केले. जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या राहुल प्रेमलवार यांचे कामाप्रती प्रभागातील जनता समाधानी असुन त्यांच्या पाठीशी असलेली युवकांची भक्कम फळी त्यांचा विजयाचा मार्ग सुकर करतील. असा विश्वास असुन होवु घातलेली प्रभागाची निवडणुक धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी होत आहे. त्यामुळे मतदार राजा धनशक्तीचा लाभ घेत जनशक्तीचा साक्षात्कार घडवतील. असा सुर उपस्थितांमधुन ऐंकायला मिळाला. त्यामुळे सध्यास्थितीत सदर प्रभागात राहुल प्रेमलवार यांचे पारडे जड असल्याचे बोलल्या जात आहे.
Home Breaking News काँग्रेसच्या राहुल प्रेमलवार यांनी केला प्रचाराचा श्रीगणेशा* *धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या लढाईत...











