उद्याच्या निवडणुकीत भूमाफिया विरुद्ध सामान्य कार्यकर्ते आमने सामने, लढती कडे जनतेचे लक्ष

0
29

मूल : उदया दिनांक 20 डिसेंबर रोजी मूल नगर परिषदेच्या प्रभाग 10 मधील गट ब ची निवडणुक होत आहे. सदर निवडणुकीत नांव बदलवून बंगाली बाबु होवू पाहणा-या भुमाफीया विरूध्द दोन सामान्य कार्यकर्त्याची
लढत होत असल्याने मतदार आणि कार्यकर्त्यांमध्यें उत्साहाची लाट पसरली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमूळे सदर प्रभागाची निवडणुक उदया होत आहे. होत असलेल्या निवडणुकीत एकुण तीन उमेदवार नशीब अजमावत आहेत. नशीब अजमावत असलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांचे समर्थक प्रयत्न करीत असून सदर निवडणुक प्रतिष्ठेची करून भुमाफीया पैश्याचा सर्रासपणे वापर करीत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक निवडणुकीत जागेचे पट्टे देण्याचे आश्वासन देवून आश्वासन पाळु न शकणारी भाजपा पुन्हा एकदा जागेचे पट्टे देण्याचे आश्वासन देत मतांची भिक मागत असून दुसरी कडे मात्र काॅंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभागाचा राहीलेला विकास आणि जनतेची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करीत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. भाऊचे नांव आणि पैश्याचा वापरामूळे आपला विजय सुनिश्चित असल्याचे राय सांगत असला तरी होवू घातलेल्या निवडणुकीत मतदार राजा आपल्यात मिसळुन काम करणारा, सहजरित्या त्यांचे पर्यंत पोहोचता येईल असा आणि पैश्याचा नव्हे तर माणुसकीचा मिजास दाखविणा-या उमेदवाराला मत देणार असल्याची प्रभागात चर्चा आहे. पैश्याची तर सोडा कधीही माणुसकी दाखवुन सहकार्याचा हात न देणारा राय मतांसाठी प्रथमचं पैसे वाटप करीत असल्याने मतदार राजाही संधीचे सोने करीत आहे. दारात चालुन आलेल्या लक्ष्मीला परत न करता प्रेमाने स्विकार करत प्रभागातील बहुतांश मतदार आम्ही तुम्हालाच मत देवू, असे सांगून पाठमो-या झालेल्या रायला वेगवेगळया शब्दात शिव्याही हासळत असल्याचे ऐकीव्यात आहे. आज संध्याकाळ पासून उदया संध्याकाळ पर्यंत प्रभागात मोठया प्रमाणात उमेदवाराच्या समर्थकांची रेलचेल राहणार असून संधी साधुन दारू आणि
पैश्याचे वाटपही केले जाणार आहे. त्यामूळे उदया होवू घातलेल्या निवडणुकीकडे प्रभागातीलचं नव्हे तर शहरातील जनतेचेही लक्ष लागले आहे. निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुक प्रशासन सज्ज झाले असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे मोठे आव्हाण पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here