मूल येथे केला दोन बोगस मतदारांनी मतदान, कॉंग्रेसने केली चौकशीची मागणी

0
50

मूल : मूल नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत येथील एका मतदान केंद्रावर दोघांच्या नांवाने बोगस मतदान केल्याचे उघडकीस आले. जागरूक मतदारांमूळे बोगस मतदानाची घटना उजेडात आल्याने सदर केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मूल येथील सुभाष नगर प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 10/3 येथे गोहणे प्रेमीला महादेव (52) आणि शब्बीर शफी शेख शेख (28) हे दोघेही दुपारी जवळपास 5 वाजताचे दरम्यान मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले. अर्धा तास रांगेत राहून जेव्हा प्रत्यक्ष मतदान कर्मचारी यांचे पर्यत पोहोचले तेव्हा त्यांचे नांवाने अन्य व्यक्तीने मतदान केल्याचे उजेडात आले. येथील प्रभाग क्रमांक 10 च्या मतदार यादीत अ.क्र. 215 वर असलेल्या प्रेमीला महादेव गोहणे यांचे नांवाने बनावट मतदार ओडख पत्र दाखवून 85 क्रमांकावर एका महिलेने मतदान केले. प्रेमीला महादेव गोहणे यांचा मूळ मतदार ओडखपत्र क्रमांक एसआरओ 0263806 असा असतांना एसआरओ 003925 क्रमांकाचे बनावट मतदार ओडखपत्र दाखविल्याचे सांगण्यात आले. तर मतदार यादीत अनुक्रमांक 28 वर असलेल्या शब्बीर शफी शेख यांचे नांवाने अन्य ओडखपत्र दाखवून 271 क्रमांकावर एका इसमाने मतदान केल्याचे निदर्शनास आले. दोघांच्या नांवाने बोगस मतदाराने मतदान केल्याचे उजेडात येताच उपस्थित काॅंग्रेसच्या उमेदवार, निवडणुक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी करत कार्यवाहीची मागणी केली. सदर प्रकाराची माहिती होताच मतदार केंद्रावर उपस्थित झालेल्या पत्रकारांनी मतदान केंद्रावर आलेल्या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी संदीप दोडे यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याची विनंती करत समाधानकारक उत्तर न देता मतदान केंद्रावरून काढता पाय काढला. दरम्यान सदर प्रकाराची काॅंगे्सच्या उमेदवाराने लेखी तक्रार नोंदवली त्यामूळे निवडणुक प्रशासन काय कारवाई करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

ज्यांचे नांवाने बोगस मतदान झाले अश्या दोन्ही मतदारांना मतदान पत्रिका देण्यांत आली असून त्या दोन्ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुक आयोगाचे निर्देश आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार बोगस मतदान संबंधीच्या तक्रारीवर निर्णय घेण्यांत येईल
मृदुला मोरे,
निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here