मूल : अखिल भारतीय समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विजय लोनबले यांचेशी काँग्रेस पक्षाशी कार्यकर्ता म्हणुन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाने कांग्रेस मध्ये खळबळ माजण्याचे किंवा नुकसान होण्याचे काहीही कारण नाही. ज्यांना ते नेते माणतात त्या नेत्याच्या पक्षात कदाचित खळबळ माजली असावी. असे मत काँग्रेसच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेले विजय लोनबले हे छगन भुजबळ यांनी निर्माण केलेल्या समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणूनच कार्यरत आहेत. समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणुन त्यांचा काँग्रेस पक्षाशी नव्हे तर भुजबळ साहेब असलेल्या पक्षाशी त्यांचा अनेकदा संबंध आलेला आहे. मागील वर्षी झालेल्या बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत लोनबले यांनी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांचा प्रचार न करता त्यांचे विरोधात अपक्ष उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. हे सत्य लोनबलेच काय समता परीषदेचे कार्यकर्तेही नाकारू शकत नाही. असे असतांनाही कांग्रेस पक्षाचे स्थानिक नेतृत्व संतोषसिंह रावत यांनी काँग्रेस पक्षाकडुन त्यांच्या पत्नीला मूल नगर परीषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार करून लोनबले यांना तसा निरोपही दिला. त्यावेळेस विजय लोनबले यांनी पत्नीला राजकारणात नाही तर समाजकारणात उतरवायचे आहे. त्यामुळे आपण स्वतः जिल्हा परिषदेची निवडणुक लढविण्याचा विचार करीत असल्याचे सांगीतले. लोनबले यांनी पत्नीला न.प.निवडणुकीत उतरवणार नसल्याचे काँग्रेसच्या जबाबदार पदाधिका-यांना सांगीतले. त्यामुळे प्रभाग ७ मधुन कांग्रेसने बहुजन समाजाच्या सक्षम आणि सुशिक्षित महीलेला निवड समितीच्या शिफारसी नुसार उमेदवारी निश्चित केली. ह्या सर्व घडामोळी घडुन गेल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी लोनबले यांनी पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणुन काँग्रेस पक्षाकडे अर्ज केला. लोनबले यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध नसतांनाही पक्षाने त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे नाकारला. पक्षाने दुसरा उमेदवार जाहीर केल्याच्या काही दिवासानंतर माञ त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरावा. हे संयुक्तीक नसुन जाहीर केलेल्या उमेदवाराचा अवमान होईल. हे ठरवुन दुसऱ्या प्रभागाचा पर्याय दिला. परंतु लोनबले यांनी नकार दर्शविला. त्यामुळे महासागर असलेल्या कांग्रेसने इच्छुकांना उमेदवारी दिली. लोनबले यांनी स्वतःहुन आपल्या पायावर कु-हाड मारून घेतली असुन ज्यांचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी काँग्रेसचे कोणतेही नुकसान आणि परीणाम होणार नाही. असे स्थानिक पदाधिका-यांनी सांगीतले.
Home Breaking News जे काँग्रेसचे कधीच नव्हते त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोणतेही नुकसान होणार नाही –...










