Home सामाजिक गरजुला जीवदान देण्यासाठी केली मित्रांनी अवयवदानाची घोषणा

गरजुला जीवदान देण्यासाठी केली मित्रांनी अवयवदानाची घोषणा

0
7

मूल : मृत्यु अटळ असला तरी मृत्युनंतर अवयवदान करून एखादया गरजू रुग्णांना नवजीवन देवु शकु, ही सामाजिक बांधीलकी जोपासुन सत्तरी पार केलेल्या दोन मित्रांनी मरणोत्तर अवयवदान करण्याची घोषणा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

दानात श्रेष्ठ अवयवदान हे ब्रिद डोळयासमोर ठेवुन मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून एखाद्याचे जीवन उजळावे, जीवन जगण्यासाठी त्यालाही संधी मिळावी, या उदात्त भावनेने स्थानिक आनंदराव शेंडे (76) आणि विवेक तुंडूलवार (70) या दोन महाविद्यालय काळातील मित्रांनी अवयवदानाचा संकल्प जाहीर केला. स्थानिक उपजिल्हा रूग्णालय येथे जावुन अवयवदानाची नोंदणी करत मैत्री फक्त जीवनभराची नाही तर मरणोत्तर जीवनदानाची हे जाहीर करून अवयवदाना विषयी समाजात सकारात्मक संदेश पोहोचवत इतरांनीही अवयवदानासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वतःपुरते न जगता समाजासाठी काहीतरी करण्याची आनंदराव शेंडे आणि विवेक तुंडूलवार या दोन मित्राची भावना जपणारा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. मृत्यूनंतरही जीवनदान या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत आनंदराव शेंडे आणि विवेक तुंडूलवार हयांनी माणुसकीचा प्रत्यय करून देत समाजा समोर आदर्श निर्माण केले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाची नोंदणी करून गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करावा, तुर्त एवढीच अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.