Home Breaking News महात्मा फुले दाम्प्त्याच्या स्मारकाच्या प्रश्नावर राजकारण तापणार, सत्ताबदलानंतर केलेल्या भाजपाचे आंदोलनामुळे शहरात...

महात्मा फुले दाम्प्त्याच्या स्मारकाच्या प्रश्नावर राजकारण तापणार, सत्ताबदलानंतर केलेल्या भाजपाचे आंदोलनामुळे शहरात वेगळी चर्चा

0
7

मूल : जानेवारी 2025 मध्यें प्रशासकिय मान्यता मिळालेल्या महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक निर्मितीचा मुद्दा शहरात चर्चेचा झाला आहे.

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोष्ट ऑफिस जवळ महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक निर्माण करण्यांत यावे, म्हणुन मागील काही वर्षापासुन माळी समाजाच्या वतीने पाठपुरावा करण्यांत येत होता. सदर पाठपुराव्याची दखल घेवुन क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैशिष्टेपुर्ण योजनेमधुन स्मारक निर्मितीसाठी 25 लाख रूपये मंजुर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने 23 जानेवारी 2025 मध्यें पोस्ट ऑफिस जवळील महात्मा जोतीबा फुले चौकात केवळ स्टील रेलींग बांधकामासाठी 25 लाख रूपयाच्या खर्चास प्रशासकिय मान्यता दिली. त्यामूळे त्यानंतरच्या चार ते पाच महिण्याच्या काळात कंत्राटदाराची निवड करून सदर बांधकामाला सुरूवात होणे अपेक्षीत होते. परंतु नगर परिषदेत प्रशासक काळ असतांना प्रशासकिय मान्यता मिळालेले सदर बांधकाम सुरू करण्यासंबंधी समाजासोबतचं कोणत्याही राजकिय पक्षाने आंदोलन तर दुर साधा पाठपुरावाही केला नाही. त्यामुळे जानेवारी 2025 मध्यें प्रशासकिय मान्यता मिळालेले काम आजपर्यंत थंडबस्त्यात पडुन होते. अलीकडे मात्र सदर स्मारकाच्या बांधकामा साठी भारतीय जनता पक्षा सोबतचं समता परिषदेने आग्रह धरला आहे. वर्षभर शांत बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांना नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर अचानक जाग आली असुन मागील महिण्याभरापासुन स्मारक निर्मितीची मागणी उचलुन धरल्याने शहरात चर्चा रंगू लागली आहे. महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक योगदान लक्षात घेता शहराच्या केंद्र स्थानी स्मारकाची निर्मिती व्हावी, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. मात्र निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता आणि संबंधीत कंत्राटदाराशी करारनामा लिहुन झाल्या नंतरही प्रत्यक्ष कामाला विलंब होत असल्याने सत्ता बदलानंतरच आंदोलनाची गरज का भासली ? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. भाजपाच्या ठिया आंदोलनानंतर नगर प्रशासनाने स्मारक निर्मितीच्या कार्यवाहीला प्रारंभ केला असला तरी सदर ठिकाणी असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरमूळे मोठी अडचण निर्माण होत आहे. 25 लाख रूपये खर्चून सदर ठिकाणी स्मारक निर्माण करावयाचे असल्यास सदर ठिकाणी प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. परंतु सदर ठिकाणची सध्यास्थिती लक्षात घेता सदर ठिकाणी निर्माणाधिन असलेल्या स्मारकावर 25 लाख रूपयाचा खर्च अनाठायी असल्याचे अनेक जाणकांराचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपामध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता असून, आगामी काळात स्मारकाचा प्रश्न शहराच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याच्या स्मारकाचा प्रश्न प्रत्यक्षात कधी मार्गी लागतो आणि त्याचे श्रेय कोण घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले असुन स्मारकाचा विषय हा कोणत्याही राजकारणाचा विषय न बनता, तो सामाजिक प्रेरणेचे प्रतीक म्हणून मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगर परिषदेत भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सदर ठिकाणी स्मारक निर्माण करून स्मारक निर्मीतीचे श्रेय घेण्याचा भाजपाचा विचार होता. म्हणुन स्मारक निर्मिती साठी जानेवारी 2025 पासुन भाजपा शांत होती. असे मत भाजपाच्या एका जबाबदार पदाधिका-याने पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्याने भाजपाचा डाव नकळत उघड झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कृपया बातमी कॉपी करू नये. बातमी शेअर केल्यास आनंदच होईल.