प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करतांना तिघांना अटक, 10 लाख 18 हजाराचा मुदेमाल जप्त

0
21

मूल : दारूची अवैद्य वाहतुक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्याच्या उदेशाने नाकेबंदी करतांना पोलीसांना एका चारचाकी वाहणामध्यें सुगंधीत तंबाखुच्या चुंगडया आढळून आल्या. आढळून आलेला सुगंधीत तंबाखु प्रतिबंधीत असल्याचे लक्षात आल्याने पोलीसांनी वाहतुक करणा-याविरूध्द कारवाई केल्याने खळबळ माजली आहे. ठाणेदार विजय राठोड यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मूल येथील सहायक पोलीस निरीक्षक अमीत आत्राम यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, राष्ट्रपाल कातकर, इंदल राठोड, भोजराज मुंढरे, सुनिल कुळमेथे, चिमाजी देवकते, धनराज नेवारे, नरेश कोडापे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, स्वप्नील खोब्रागडे आणि विशाल वाढई खेडी गोंडपिपरी मार्गावरील बेंबाळ येथे नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करत होते. दरम्यान गोंडपिपरी कडून आलेल्या टाटा पंच क्रमांक एमएच 33 एसी 5209 ची तपासणी केली तेव्हा सदर वाहणामध्यें होला हुक्का शिशा तंबाखु, मजा तंबाखु, ईगल तंबाखु वेगवेगळया चुंगडयामध्यें ठेवलेल्या दिसून आल्या. चुंगडयामध्यें ठेवलेला संपुर्ण तंबाखु विक्रीसाठी प्रतिबंधीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी तंबाखुच्या सर्व चुंगडया ताब्यात घेत कारवाई केली. तंबाखु विक्रीवर प्रतिबंध असतांना गैरकायदेशीर रित्या 4 लाख 18 हजार 490 रूपये किंम्मतीच्या तंबाखुची वाहतुक करणे गुन्हा असल्याचे सिध्द झाल्याने पोलीसांनी प्रतिबंधीत तंबाखुची वाहतुक करण्यासाठी वापरलेल्या 6 लाख रुपये किमतीच्या टाटा पंच सह वाहण चालक सुरज रमेश हजारे, साहील बाबुराव वेस्कळे दोघेही रा. व्याहाड बुज आणि गडचिरोली येथील राहुल पुरूषोत्तम खोब्रागडे यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यांत आली. विशिष्ट कंपन्याच्या तंबाखु, गुटखा विक्रीवर बंदी असतांना अनेक ठिकाणी प्रशासनाच्या डोळयात धुळ झोकुन सर्रासपणे प्रतिबंधीत तंबाखु विक्री होत असल्याने युवापिढी मोठया प्रमाणात व्यसनाधिन झाली आहे. या बाबीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याने प्रतिबंधीत तंबाखु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. सदर घटनेच्या चार दिवसांपूर्वी मूल पोलीसांनी सापळा रचून लाखो रूपये किंम्मतीची विदेशी दारू हस्तगत केली होती. हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here