युवाशक्ती क्रिडा मंडळाच्या पटांगणावर रंगणार तीन दिवस कबड्डीचा महासंग्राम, 16 ते 18 जानेवारी दरम्यान सामन्याचे आयोजन

0
23

मूल : महाराष्ट्राची संस्कृती जपत मूल येथील युवाशक्ती क्रिडा मंडळाने ग्रामीण परिसरातील खेडाळूंकरीता युवाशक्ती क्रिडा मंडळाच्या पटांगणावर मातीतल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. दिनांक 16 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजीत करण्यांत आलेल्या ग्रामीण भागातील खेडाळूंच्या महासंग्रामात प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे कडून रोख 51 हजार रूपये आणि चषक देण्यांत येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांचे संयुक्त विद्यमाने दुसरा क्रमांक पटकावणा-या संघाला 31 हजार रूपये रोख आणि चषक, नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ आणि नगरसेवक प्रशांत समर्थ यांचे कडून 21 हजार रूपये रोख आणि चषक असे तृतीय पारितोषीक देण्यांत येणार आहे. युवाशक्ती क्रिडा मंडळाकडून प्रौत्साहनपर चतुर्थ क्रमांकासाठी 11 हजार रूपयाचे रोख बक्षीस दिल्या जाणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ठ रेडर याला अली अब्बास मिस्त्री, सर्वोत्कृष्ठ ऑलराऊंडरला अरविंद करपे आणि सर्वोत्कृष्ठ डिफेंडर करीता लवनिश उधवाणी यांचे कडून प्रत्येकी 3 हजार रूपयाचे बक्षीस दिल्या जाणार आहे. ग्रामीण परिसरातील ज्या कबड्डी संघाला महासंग्राम मध्यें सहभाग घ्यायचा असेल त्यांनी प्रवेश शुल्क आणि अधिक माहिती करीता तेजस महाडोळे (9922733345) सागर मांडवकर (8668925907) आणि अविनाश चहार (7219758495) यांचेशी संपर्क साधुन 500 रूपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रूपलसिंह रावत, उपाध्यक्ष प्रविण चेपुरवार, कोषाध्यक्ष गुलाबखाॅ पठाण, सचिव चतुर मोहुर्ले, सहसचिव चंद्रकांत चटारे आणि क्रिडा प्रमुख दिपक चुगाणी यांनी संयुक्तरित्या केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here