नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून कही खुशी कही गम, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किरण पेक्षा एकता जड

0
30

मूल : मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत सुरू असलेल्या लाथाडयायांमुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
सामाजिक समीकरणे, स्थानिक पातळीवरची मैत्री-विरोध, पक्षातील गटबाजी आणि अनपेक्षित उमेदवारी घोषित झाल्यानंतर उभा राहिलेला नाराजीचा सुर भाजपसाठी अनुकुल नसल्याचे बोलल्या जात आहे. भाजपने अपेक्षित असलेले एकमत किंवा प्रखर कार्यकर्ता समर्थन प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्या पासून दिसत नसून उलटपक्षी कार्यकर्त्यांमध्ये ही उमेदवारी कुणाच्या दबावाखाली देण्यात आली ? असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. विशेषतः शिक्षित, तरुण आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या पर्यायी नावांना दुर्लक्षित करत अचानक एका उमेदवाराची निवड केल्याने कार्यकर्त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे समजते. स्थानिक पातळीवर भाजपचे काही नेते एकमेकांच्या विरोधात थेट मैदानात उतरले असून प्रभागांमध्ये गुप्तपणे विरोधी हवा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. उमेदवारी मिळाल्या पासून उमेदवारापेक्षा नाराज कार्यकर्तेच जास्त दिसत आहेत, अशी टीका काही माजी पदाधिका-्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे. सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने पाहता, नगराध्यक्ष पदासाठी ज्या समाज घटकाचा पाठिंबा निर्णायक ठरतो त्या प्रमुख घटकांमध्ये भाजप उमेदवाराविषयी अद्याप विश्वास निर्माण झालेला दिसत नाही. विशेषतः महिला, शेतकरी, कामगार आणि मध्यवर्गीय मतदारांमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, अनुभव आणि स्थानिक समस्यांवरील पकड याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याउलट प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ एकजुटता दाखवत प्रचाराची तयारी सुरू केली असून त्यांचा जमिनीवरील एकत्रितपणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या आतल्या घरातच सुरू असलेला विरोधाचा आवाज जर असाच वाढत गेला, तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पक्षाच्या अंगलट येणे नक्की असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत असून दुसरीकडे मात्र काॅंग्रेसच्या सौ. एकता समर्थ यांच्या पाठीशी त्यांचे पती प्रशांत समर्थ यांनी नगर सेवक म्हणून आजपर्यंत केलेल्या कार्याची शिदोरी, त्यांचा मनमिळावू स्वभाव, सहकार्याची भूमीका आणि विस्तारलेला मित्र परिवार त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पदावर निर्वाचित झाल्यानंतर शहर विकासासाठी कोण अधिक वेळ देवू शकेल, याचीही मतदारांमध्यें चर्चा रंगत असतांना सुरू असलेले पक्षबदलही कोणाच्या नां कोणाच्या पथ्यावर पडणार आहे. भाजपा सोबतचं काॅंग्रेस मध्येंही किरकोळ कुरघोडया आहेत. परंतू काॅंग्रेस पेक्षा भाजपा मध्यें मोठया प्रमाणांत कुरघोडया आणि नाराजीचा सुर दिसून येत असल्याने सध्यास्थितीत सट्टा बाजारातही काॅंग्रेसचा पारडा जड असल्याचे ऐकीव्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here