मूल शहर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदी मिथुनसिंग पटवा यांची नियुक्ती, संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस प्रवेश

0
32

मुल : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा झालेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांसह मिथुनसिंग पटवा यांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन नीलमवार यांनी संतोषसिंह रावत यांच्या निर्देशानुसार मिथुन सिंग पटवा यांची युवक काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मिथुन सिंग पटवा यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. आगामी नगर पालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता बसवण्यासाठी युवकांनी परिश्रम घ्यावे कारण काँग्रेसच युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो असे मत संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. पक्ष प्रवेश कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, युवक काँग्रेसचे पवन नीलमवार, प्रशांत उराडे, आकाश दहिवले आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here