मूल : राज्य निवडणुक आयोगाने नगर परीषद आणि नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामूळे निवडणुक असलेल्या शहरात आदर्श आचारसंहीता लागु झाली आहे. त्यामूळे आचारसंहीता लागु असलेल्या शहरात राजकीय कार्यक्रम आणि प्रचार-प्रसार करतांना नियमानुसार निवडणुक विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना मूल शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परीषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्याने आचार संहीता लागु झाल्याचे पहील्याच दिवशी वचन देतो-पूर्ण करणार असे नमुद करत मूल शहरात वृत्तपञामधुन पाँम्प्लेट वाटप केले. वृत्तपञाच्या माध्यमातुन घरोघरी वाटप करण्यात आलेल्या भाजपाच्या पाँम्प्लेट मध्ये नियमानुसार प्रकाशक शिवाय मुद्रक आणि प्रतीचा उल्लेख असणे अनिवार्य आहे. असे असतांना वाटप करण्यात आलेल्या पाँम्प्लेट मध्ये केवळ प्रकाशकाचे नांव नमुद असुन प्रती आणि मुद्रकाचा कोठेही नाम्मोलेख नाही. ही कृती आचारसंहीतेचे उल्लंघन करणारी आहे. शिवाय उत्कृष्ट सुचना देणाऱ्या नागरीकांना प्रथम तीन आणि प्रौत्साहनपर ५१ अश्या ५४ जणांना पारितोषिकाचे नांवाखाली हजारो रूपयाचे आमिष दाखविणे. हा बाब निवडणुक काळात आचारसंहीतेची उल्लंघन करणारी आहे. त्यामूळे नागरीकांना आर्थीक प्रलोभन दाखविणारे अनधिकृत पाँम्प्लेट छापुन शहरात वितरीत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या संबंधिता विरूध्द कारवाई करावी. अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडे केली आहे. त्यामूळे नगर परीषद निवडणुकीच्या सुरूवाती पासुनच शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाल्याचे दिसुन येत आहे.,
Home Breaking News निवडणुक आचार संहीतेच्या काळात आर्थिक प्रलोभन दाखविणा-या भाजपा विरूध्द काँग्रेसची तक्रार, अनधिकृत...









