अवैद्यरित्या दारूची वाहतुक करतांना दोघांना अटक, 6 लाखाचा ऐवज पोलीसांनी केला हस्तगत

0
16

मूल : मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील डि. बी. पथकाने सापळा रचून काल दुपारी 2 वाजताचे सुमारास स्विप्ट कारमधून देशी दारू आणि बिअरच्या पेटीसह 6 लाख 20 हजाराचा ऐवज आणि दोघांना ताब्यात घेतल्याने वर्षाच्या मावळत्या काळात अवैद्य दारू व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे. पोलीसांनी ही कारवाई विरई ते भेजगांव कडे जाणा-या मार्गावर केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, सहकारी पोलीस कर्मचारी भोजराज मुंढरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, संदिप चुधरी, शंकर बोरसरे आणि दिलीप आदे सापळा रचून असल्याचे दिसताच आरोपी वाहन चालक सुनिलसिंग बैस, बाजार वार्ड चंद्रपूर हयाने स्विप्ट कार क्रमांक एमएच 33 व्ही 7780 भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालवून भेजगांव दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करतांना पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता कार मध्यें देशी दारू आणि बिअरच्या पेटयांसह एकुण 6 लाख 20 हजार 480 रूपयाचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला. त्यावरून पोलीसांनी वाहणासह वाहण चालक सुनिल बैस आणि गोंडपिपरी तालुक्यातील वटराना येथील सहकारी नरेंद्र पिटाले याला ताब्यात घेवून बोलते केले तेव्हा ताब्यात असलेल्या दोघांनीही सदरचा गुन्हा मान्य करत कार मधील दारूची माहिती दिली. दोघांचाही सांगण्यावरून पोलीसांनी ताब्यात असलेल्या सुनिल बैस आणि नरेंद्र पिटाले यांचेसह भेजगांव येथील अखील गांगरेड्डीवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून वाहणासह देशी दारू व बिअरच्या पेटयासह ऐवज पोलीसांनी ताब्यात घेतला. दरम्यान आरोपी वाहन चालक सुनिल बैस आणि सहकारी नरेंद्र पिटाले यांना सुचनापत्र देवून काल मध्यरात्री नंतर सोडण्यांत आले. पाहिजे असलेले तिसरे आरोपी अखील गांगरेड्डीवार यांचे विरूध्दची कारवाई सुरू असल्याचे पोलीसांनी सांगीतले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले आणि ठाणेदार विजय राठोड यांचे मार्गदर्शनात डि.बी.पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here