मूल – मूल नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपने जाहीर केलेली किरण किशोर कापगते यांची उमेदवारी सध्या शहरात चर्चेची झाली असून त्यांची उमेदवारी भाजपची नाही तर संघाच्या आदेशासमोर भाजपाने शरणागती पत्करल्याची मतदारांशिवाय भाजपाच्या कार्यकर्त्यां मध्येंही चर्चा आहे.
होवू घातलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीकरीता नगराध्यक्ष पदासाठी इंजी. शिवानी संदीप आगडे यांचे नांव जवळपास निश्चित झाले होते. त्यांच्या नांवाला पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सुध्दा समर्थन दिले होते. त्यामूळे नगराध्यक्ष पदाच्या निडणुकी करीता शहरवासीयांचे लक्ष लागले होते. परंतू उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवसपूर्वी भाजपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून प्रा. किरण किशोर कापगते यांचे नांव जाहीर केले. त्यामूळे भाजपच्या कार्यकत्र्यासह नगर सेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्यें चर्चेला पेव फुटले. शिवानी आगडे यांचे नांव पहिल्या स्थानावर असतांना अचानक दुस-या स्थानावर असलेल्या किरण कापगते हया पहिल्या स्थानावर आल्याच कश्या ? याबाबत चर्चा रंगू लागताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अदृष्य हात समोर आले. सध्यास्थितीत मूल निवासी असलेल्या किरण कापगते यांचे माहेर नवरगांव. एकेकाळी जिल्हयातील संघाचा संपुर्ण कारभार नवरगांव येथील बोरकर पाटलांच्या वाडयातून चालायचा. त्याच बोरकर वाडयात लहानाच्या मोठया झालेल्या किरण यांचेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभाव असून बालपणापासूनच संघाच्या विचारधारेत वाढलेल्या आहेत. आजही त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांची नाळ संघाच्या वरीष्ठ मंडळींशी जुळून असल्याने शेवटच्या दिवशी जुळून असलेल्या याच नाळीने चमत्कार घडवत नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ आगडे ऐवजी कापगते यांच्या गळयात टाकली. हे आता सर्वश्रृत झाल्यामूळे शहरातील सर्वसामान्य, सर्वधर्म, सर्ववर्गीय नागरिकांना समान न्याय आणि विकासाची हमी देणे भाजपाला कसे शक्य होईल. असा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण झाला असून भावी नगराध्यक्ष शहराच्या विकासासाठी असावा की संघाची विचारधारा जोपासणारा असावा. असे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. जन्माने कलार समाजाच्या असल्या तरी विवाहानंतर बहुजन तेली समाजाच्या झालेल्या इंजी. शिवानी आगडे यांचे विषयी पक्षासोबतचं मतदारांमध्येंही प्रचंड सकारात्मक प्रतिसाद असताना अचानक त्यांना वगळुन दुस-या स्थानावरच्या किरण कापगते यांना संघाच्या दबावाखाली उमेदवारी देण्यांत आल्याच्या चर्चेनी भाजपामध्यें धुसफुस माजली असून शिवानी आगडे सारख्या अनेकांना ऐनवेळेवर उमेदवारी पासून वंचित ठेवल्यामूळे त्यांचेतही नाराजीचा सुर पसरल्याचे ऐकीव्यात आहे. रस्ते, नाल्या आणि इमारती बांधण्यात धन्यता माणणा-या नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी 2016 च्या निवडणुकीत शहरवासीयांना नळांद्वारे चोवीस तास पाणी उपलब्ध करून देवू अश्या प्रकारचे अनेक आश्वासन दिले होते. त्यापैकी मोजक्या आश्वासनाची पुर्तता झाली असली तरी आजही अनेक समस्या शहरवासीयांसमोर उभ्या आहेत. मागील कार्यकाळात पुर्णवेळ आणि उच्च शिक्षीत नगराध्यक्ष देवूनही भाजपा निवडणुक पूर्व दिलेल्या आश्वासनांची पुर्तता आजही करू शकलेले नाही. होवू घातलेल्या निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्ष पदाकरीता उच्च शिक्षीत उमेदवार दिला असला तरी त्या मूल पासून 12 कि.मी.अंतरावर नोकरीवर आहेत. त्यामूळे त्यांचे कडून शहरविकासा करीता पुर्णवेळ देणे कसे शक्य होईल ? असा सवाल करत भाजपाची काही मंडळी आजही संभ्रमात आहेत. शहर विकासासाठी पुर्णवेळ नगराध्यक्ष देवू शकत नसू तर मतदारांना सांगायचे काय ? असे म्हणत किरण पेक्षा शिवानीच योग्य होती. असा सुर आजही त्यांचेतून ऐंकायला मिळत आहे.
Home Breaking News नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत संघाची छाप, संघाच्या आदेशासमोर भाजपची शरणागती, शहराच्या सर्वसमावेशक विकासा...









