मूल : मतचोरी करून राज्यात सत्ता मिळवणा-या महायुती सरकारला सामान्य माणसांशी काही देणे-घेणे नसून स्वार्थीपणा जोपासत राज्याला कंगाल करून ठेवले आहे. घोटाळे करण्याऐवजी विकासाला भर दिला असता तर मतचोरीचा प्रसंग ओढवला नसता. अश्या मतचोरी करून राज्याला उध्वस्त करू पाहणा-या भाजपाला वठणीवर आणण्यासाठी मतभेद विसरून निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
मूल तालुका व शहर काॅंग्रेस कमेटीच्या वतीने आयोजीत कार्यकर्ता आढावा बैठक आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, प्रदेश सरचिटणीस तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विलास मोगरकर, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, महिला काॅंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पुल्लावार, जि.प.माजी सदस्या मंगला आत्राम, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष वासुदेव पाल, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, महीला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार यांचेसह काॅंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. संकटात सापडलेल्या शेतक-यांना सहकार्य न करता महायुती मधील काही महाभाग शेतक-यांना शत्रु समजून चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान करून धार्मिक आणि जातीयवादाला रंग देण्याचा अशोभनिय प्रकार करीत असल्याचा आरोप करतांना आ.विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचा त्याग करून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या प्रशांत समर्थ आणि त्यांच्या सहका-यांचे कौतुक केले. माजी आमदार देवराव भांडेकर आणि प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना स्थानिक भाजपामधील गटबाजी काॅंग्रेससाठी लाभदायी राहणार असून मत आणि मनभेद विसरून निवडणुकीचा प्रचार करण्याची कार्यकर्त्यांना विनंती केली. कार्यकर्ता आढावा बैठकीच्या निमित्याने मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा दरार युवक व दुर्गा मंडळाचे निर्माते,भाजपा कार्यकर्ते प्रशांत समर्थ, दरार महिला मंडळाच्या अध्यक्ष एकता समर्थ, भाजपा कार्यकर्ते राहुल येनप्रेड्डीवार, संतोष ठाकुरवार, रितीक गोयल, स्वप्नील श्रीरामे, प्रविण खानोरकर, सुनिल महाडोळे, दिनेश लेनगुरे, धर्मा चौधरी, सोनी ठाकुरवार, प्रणाली येनप्रेड्डीवार, संगीता मोहुर्ले, मनिषा ठाकुरवार, आकाश इन्नमवार, गौरव बावणकर, अरविंद पोहणे यांचेसह दिडशेच्या वर भाजपा व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. विजय वडेड्डीवार यांचे उपस्थितीत स्थानिक काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी प्रास्ताविक केले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि महीला अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.
Home Breaking News मतचोरी करून सत्ता मिळविलेल्या भाजपाला वठणीवर आणण्यासाठी मतभेद विसरून कामाला लागा –...









