मूल – स्थानिक बालविकास प्राथमिक विद्यालय येथील शिक्षक विवेक विनोद हरमवार (वय 40) यांनी कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधून स्व:ताचे घरी गळफास लावून जीवन संपविले. सदर घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्ये बाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. मनमिळाऊ शिक्षकांच्या आत्महत्ये मुळे शोककळा पसरली आहे.
मृतका विवेक हरमवार हा शिक्षक मूळचा सावली तालुक्यातील साखरी येथील रहिवाशी असून बाल विकास शाळेत शिक्षक होता. दिवाळीच्या सुट्यांचा कालावधी असल्याने कुटुंबियांना घेऊन ते काही दिवसांपासून बाहेरगावी होते. आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ पासून नियमित शाळा सुरू झाली असूनही विवेक हरमवार शिक्षक हा शाळेत उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर सहकारी शिक्षकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या नातेवाइकांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांनी स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. त्याला आई, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. विवेक हरमवार हे शहरातील मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले आहे. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून मूल पोलिस पुढील तपास करीत आहे.
 
            