मूल : अवकाळी पावसामूळे परिसरातील धान पिकाचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे, त्यामूळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यांत यावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टीचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी केली आहे. काल संध्याकाळी तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला, मुसळधार अवकाळी पावसामूळे कापणी करीता झालेले धान शेतात आडवे पडले आहे, त्यामूळे ज्या प्रमाणांत धानाचा भरणा व्हायला पाहिजे त्याप्रमाणात भरणा होत नसल्याने हाती येणारे पीक अत्यल्प येणार आहे. हलक्या जातीचे कापणी करून ठेवलेले धान शेतात गोळा झालेल्या पावसाच्या पाण्याने खराब झाले आहे. त्यामूळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आधीच आर्थिक विवंचनेत राहणा-या शेतक-यांना समाधानकारक उत्पन्नापासून मुकावे लागेल कि काय अशी भिती त्यांना वाटु लागली आहे. तालुक्यातील शेतक-यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली धान पिक अवकाळी पावसामूळे खराब झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहा भागवायचा कसा. बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड करायची कशी. पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलायची कशी असे अनेक प्रश्न तालुक्यातील शेतक-यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामूळे अवकाळी पावसामूळे झालेल्या शेत पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यांत यावी. अशी मागणी संतोषसिंह रावत यांनी शासनाकडे केली आहे.
कर्जमाफी आणि इतर शेतकरी विषयक मागण्यांच्या पुर्ततेसाठी माजी मंत्री बच्चु कडु आणि अन्य शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात सुरू असलेले शेतक~यांचे आंदोलन रास्त असून न्यायहक्काचा लढा आहे. त्यामूळे शेतक-यांच्या या आंदोलनाला पाठींबा जाहीर करीत असून आंदोलक शेतकरी नेत्यांच्या आवाहनानुसार काॅग्रेसच्या वतीने बल्लारपूर मतदार संघात आंदोलन करण्यांत येईल.
संतोषसिंह रावत, सरचिटणीस, म.प्र.काॅंग्रेस पार्टी












