विजयासाठी मन आणि मतभेद विसरून कामाला लागा – प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

0
2

मूल : काॅंग्रेस पक्षाचा प्राण असलेल्या कार्यकर्त्यांनी मन आणि मत भेद विसरून एकदिलाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचाराला लागावे, आपल्या एकजुटीमूळे विजय सहज संपादन करता येईल. असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. गडचिरोली येथून चंद्रपूर कडे जात असतांना स्थानिक गांधी चौकात तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून केलेल्या स्वागताचा स्विकार प्रसंगी हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. स्थानिक गांधी चौकात आगमन होताच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला त्यांनी अभिवादन केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा काॅंग्रेसचे स्थानिक नेते संतोषसिंह रावत, राजगड येथील माजी सरपंच चंदुपाटील मारकवार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दिनेश चोखारे, विलास मोगरकर, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, बल्लारपूर येथील अब्दुल करीम शेख, माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, आदि पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मूल येथे प्रथम आगमन झाल्याप्रित्यर्थ तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहरअध्यक्ष सुनिल शेरकी, महिला अध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडपवार आदिंनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नेते संतोषसिंह रावत यांनी होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्ष कार्यकत्र्यांच्या बळावर विजय संपादन करून दाखवेल. असा विश्वास दिला. यावेळी माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरूदास चौधरी, डाॅ. पद्माकर लेनगुरे, हसन वाढई, विलास कागदेलवार यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here