मूल – शेतीसंदर्भातील ऑनलाईनेच काम आटोपुन गांवाकडे परत जात असतांना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने बाप लेकाचा जागीच तर तिसरा रूग्णालयात नेतांना दगावल्याची घटना मूल-मारोडा मार्गावरील बल्की देव जवळ बुधवारी दुपारी 1 वाजता दरम्यान घडली.
तालुक्यातील मारोडा येथील देवीदास शेंडे (५८) आणि यश शेंडे (२७) हे बाप लेक शेती संदर्भातील ऑनलाईनचे काम करण्यासाठी सकाळी मूल येथे हीरो फँशन प्रौ (एमएच-३४-बीएक्स-८८६३) ने आले होते, काम आटोपुन दोघेही दुचाकीने स्वगांवाकडे परत जात असतांना मार्गावरील बल्की देव लगतच्या वळण मार्गावर भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे भादुर्णा येथुन मूल कडे होंडा डिलक्स (नंबर प्लेट तुटलेली आहे) ने येत असतांना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की मुलगा यश शेंडे आणि वडील देविदास शेंडे, दोघेही रा. मारोडा हे जागीच मृत्यु पावले तर वासुदेव सहारे रा. भादुर्णा यांचा उपजिल्हा रुग्णालय मूल येथे नेत असतांना मार्गामध्येच मृत्यु झाला. मूल पोलीसांनी घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दोनोडे आणि पो.काँ. नरेश कोडापे आणि सहकारी करीत आहे. अपघातात मृत्यु पावलेला शेंडे परीवारात आई वडीलासह भाऊ बहीण असा चार जणांचा परीवार होता, झालेल्या अपघातामध्ये बाप लेकाचा मृत्यु झाल्याने कुटूंबात आता माय लेकीच राहील्या असुन दोन्ही कर्ते पुरूष मृत्यु पावल्याने शेंडे कुटूंबिय निराधार झाले आहे.












