काकुच्या प्रयत्नाला दिली पुतण्याने साद, मार्गाच्या चौपदरीकरणासाठी मुख्यमंञी धरणार केंद्र सरकारकडे आग्रह, मार्निंग ग्रृपच्या मागणीची मुख्यमंञ्यानी घेतली दखल

0
46

मूल : मार्गाच्या दुरूस्ती नंतर अल्पावधीत झालेली मार्गाची दुरावस्था, जड आणि हलक्या वाहणांची वाढती संख्या, दिवसेंदिवस होत असलेले अपघात लक्षात घेवून मूल-चंद्रपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे. या जनमागणीचे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले असून यासंबंधी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार. असे आश्वासन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना दिल्याने मागणीकर्त्या मार्निग ग्रृपमध्यें आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मूल वरून गेलेल्या गडचिरोली ते चंद्रपूर राज्यमार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्यानंतर शासनाने गडचिरोली पासून चंद्रपूर पर्यंतच्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. गडचिरोली पासून मूल पर्यंतच्या महामार्गाचे सिमेंटीकरणा सोबतचं चौपदरीकरण केले, परंतू मूल ते चंद्रपूर पर्यंतच्या मार्गाचे सिमेंटीकरणासोबतचं चौपदरीकरण न करता जंगल आणि वन्यप्राण्यांचे कारण समोर करून दोन वर्षापूर्वी केवळ डांबरीकरण करण्यांत आले. सदर महामार्गाने मोठया प्रमाणांत आंतरराज्यीय जड वाहतुक होत असल्याने मूल पर्यंत करण्यांत आलेला सिमेंट मार्ग सध्यास्थितीत सुस्थितीत आहे, परंतू मूल ते चंद्रपूर पर्यंत करण्यांत आलेले डांबरीकरण अल्पावधीतच उखळले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली आहेत. महामार्गाचे रूंदीकरण न करता तेवढेच अंतर कायम ठेवल्याने वाढत्या वाहतुकीमूळे अपघांताची संख्याही वाढली असून आजपर्यंत अनेक जीव गमावली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून शासनाने मूल ते चंद्रपूर महामार्गाचे रूंदीकरणासह मजबुतीकरण करावे. अशी मागणी शहरातील मार्निंग ग्रृपने उचलून धरली. सदर मागणीच्या पुर्ततेसाठी काही दिवसांपूर्वी मार्निंग ग्रृपच्या सदस्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची भेट घेवून मागणीच्या पुर्ततेसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्याची विनंती केली. मार्निंग ग्रृपच्या सदस्यांची विनंती मान्य करत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केली. वस्तुस्थिती अवगत करून देत मूल ते चंद्रपूर मार्गाच्या चौपदरीकरणासोबतचं मजबुतीकरणासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. शोभाताई फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीचे समर्थन केले, सदर मागणीच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडून मंजुरी मिळवून देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी शोभाताई फडणवीस यांना आश्वासन दिले. त्यामूळे मार्निंग ग्रृपने उचलून धरलेली मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी लवकरच पुर्णत्वात येणाार असून माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे नेतृत्वात मार्निंग ग्रृपचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेणार असल्याची चर्चा आहे. रेल्वे मालधक्का हटाव मूल शहर बचाव या मागणीच्या पुर्ततेसाठी मार्निंग ग्रृपच्या सदस्यांनी काही वर्षापूर्वी जन आंदोलन उभारून सातत्याने पाठपुरावा केला, त्यामूळे मूल येथे होणारा रेल्वे मालधक्का शासनाला इतरत्र हलवावा लागला. या मागणीच्या यशस्वीते नंतर मार्निंग ग्रृपने मार्गाच्या चौपदरीकरणाची समस्या उचलून धरत पाठपुरावा केला. याही मागणीच्या पुर्ततेसंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शविल्याने मार्निंग ग्रृपच्या प्रयत्नाला दुस-यांदा यश मिळणार असल्याने नागरीकांमध्यें मार्निंग ग्रृपच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here