मूल : ग्राम पंचायत मधील नियमबाह्य कारभाराचा विरोध करीत असल्याने आपल्याला बदनाम करण्यासाठी खोटी तक्रार दाखल करून राजकीय दबावातुन आपल्या विरूध्द गुन्हा दाखल करून नाहक ञास दिल्या जात असल्याचा आरोप उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी केला आहे.
आयोजित पञकार परीषदेत बोलतांना ग्राम पंचायत चांदापूर येथील उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी राजीनाम्याने रिक्त झालेले ग्राम पंचायतचे शिपाई पद शासन नियमाप्रमाणे भरण्याचे २० मार्च रोजीच्या मासीक सभेत ठरले. त्यानुसार जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर २१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी करण राजु पोटे थकबाकीदार असल्याने अटी आणि शर्थी नुसार ते अपाञ होते. तरीसुध्दा त्याला अधिकाराचा दुरूपयोग करून पाञ ठरविण्यात आले. प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी मुख्याध्यापक नैताम आणि शिक्षक परसावार यांची नियुक्ती करून २५ मार्च रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. परीक्षक म्हणुन नियुक्त केलेल्या शिक्षकांनी प्रश्नपञीका काढून उमेदवाराची परीक्षा घ्यावी व गुणवत्तेनुसार निकाल जाहीर करतांना सर्व प्रक्रीयेची चिञीकरण करण्याचे ठरले. ठरल्यानुसार २५ मार्च रोजी शिपाई पदाची परीक्षा असल्याने उपसरपंच म्हणुन मी आणि इतरही सदस्य ग्राम पंचायती मध्ये पोहोचलो. तेव्हा सरपंच व काही सदस्यांनी शिपाई पदाची परीक्षा न घेण्याबाबत पञ दिले असुन तशी सुचना सरपंच यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने सुचना फलकावर लावल्याचे सचिव शमा शेख यांनी आपल्याला सांगितल्याचे मार्गनवार म्हणाले. सरपंच व इतर सदस्यांची ही कृती गैर असुन मासीक सभेत झालेल्या ठरावाचा अवमान करणारी आहे. म्हणुन मी व इतर दोन सदस्यांनी सरपंच यांना परीक्षा रद्द करून नियमाचा भंग करीत असल्याबाबत पञ देवुन कारण विचारले. सरपंच व त्यांच्या सहकारी सदस्यांना आर्थिक हेतु ठेवुन दिलीप भगवान पोटे या त्यांच्या मर्जीतल्या उमेदवाराची शिपाई पदावर नियुक्ती करावयाची होती. परंतु आम्ही त्यांचा विरोध केला, त्यामूळे संतप्त झालेल्या सरपंच व त्यांच्या सहका-यांनी गावांतील त्यांच्या पक्षातील काही मंडळीच्या सहकार्याने माझा विरूध्द डाव रचला. घटनेच्या दिवशी (२६ मार्च) माझी पत्नी साहीत्य घेण्यासाठी रस्त्याने जात असतांना ग्रा.पं.सदस्या सुनिता कडुकर व तिचा पती लोमेश कडुकर यांनी माझ्या पत्नीला रस्त्यावर अडवीले. तुझ्या नव-याने आमच्यावर पैसे खाल्याचा आरोप केला. असं म्हणत रस्ता अडवुन तीला धक्काबुक्की केली, यामुळे माझी पत्नी घाबरून काम न करताच घरी परत आली व मला घटना सांगुन रडायला लागली. तेव्हा आवश्यक असलेली वस्तु घेण्यासाठी मी घराबाहेर पडलो. तेव्हा ग्रा.पं. सदस्य सुनिता कडुकर आणि लोमेश कडुकर यांनी मलाही रस्त्यावर अडविले. पैसे खाल्याचा आरोप केलास म्हणुन सुनिता कडुकर यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करत चप्पल घेवुन अंगावर धावुन येत मला मारहाण केली. तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी मी सुनिता कडुकर यांचे हात पकडुन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक ग्रामस्थांशिवाय माजी उपसरपंच तथा भाजपाचे पदाधिकारी दिलीप पाल घटनास्थळी हजर होते. त्यांनी सुनिता कडुकर ह्यांना मला चप्पलेने मार अशी उत्तेजना देवुन तुझ्या अंगावर पाड. मी व्हीडीओ काढतो असे जोराने ओरडुन सांगत होता.
हा सर्व प्रकार पुर्वनियोजीत असुन मारहाण दरम्यान कोणी सोडविल्यास तुमचेही असेच हाल करू. अश्या धमक्या दिलीप पाल देत होता, त्यामूळे सुनिता कडुकर मला मारत असतांना कोणीही सोडविण्यासाठी येत नव्हते तेव्हा मलाच तीचा प्रतिकार करत काढता पाय घ्यावा लागला. अशी वस्तुस्थिती आणि व्हीडीओ असतांना स्थानिक पोलीसांनी माझ्या विरूध्द गुन्हा दाखल केला.
पोलीसांकडून झालेली कारवाई अयोग्य आणि अन्यायकारक आहे. मारहाण होत असतांना चेतावनी देवुन व्हीडीओ काढणारा दिलीप पाल गावांतील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवित होता. असे व्हीडीओत स्पष्ट दिसत असतांना पोलीसांनी त्याचे विरूध्द कोणतीही कारवाई केली नाही. पोलीसांची ही कृती चोर सोडुन संन्याशाला फाशी देणारी असुन राजकीय दबावात केलेली कारवाई असल्याचा आरोप अशोक मार्गनवार यांनी केला.
यापुर्वीही दिलीप पाल यांच्या सांगण्यावरून सरपंच यांनी आपल्याला ग्राम पंचायतीच्या सभेत मारहाण केली होती. तेव्हाही आपल्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. पण शेवटी सत्यस्थिती उजेडात येवुन अन्याय करणाऱ्यांना त्यांची जागा त्यांना दिसली. तेव्हा पोलीस प्रशासनाने घडलेल्या घटनेत राजकीय दबावाला बळी न पडता वास्तविकतेची शहानिशा करून कारवाई करावी. अन्यथा न्याय मागण्यासाठी उचीत मार्गाचा अवलंब करावा लागेल. असा इशाराही मार्गनवार यांनी दिला. यावेळी घटनेतील प्रत्यक्ष साक्षदार मारोती मेश्राम, जयवंत गेडाम, बेबीताई कुमरे, सुनिता गेडाम, रेखा सिडाम आदी उपस्थित होते.












