पराभवाच्या भितीने मुनगंटीवारांची तो मी नव्हेच नाटीका, जनतेची दिशाभुल करणाऱ्या मुनगंटीवार पासुन जनतेनी सावध राहावे- काँग्रेस तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांची विनंती

0
132

मूल : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची पुनरावृत्ती होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत होणार असल्याची खात्री झाल्याने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी उलटा चोर कोतवाल को डाटे ची भूमीका स्विकारली असुन पदाच्या दुरुपयोग आणि प्रशासनकर्त्यांच्या सहकार्याने काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांविरुद्ध निराधार आरोप करून तो मी नव्हेच अशी सावध भूमिका स्विकारत मतदारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुदास गुरनुले यांनी केला आहे.

निवडणुकीत लागु असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून तालुक्यातील येरगाव येथे रात्री दहा वाजता नंतर सार्वजनिक ठिकाणी नागरींची सभा घेऊन कार्यकर्त्यांच्या मार्फतीने पैसे वाटप करीत असल्याची माहिती काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचेसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वस्तूस्थिती समजून घेण्याकरिता उमेदवार संतोषसिंह रावत येरगाव येथे गेले, तेव्हा भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी गाशा गुंडाळून पळ काढला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांच्या वाहणाचा पाठलाग केला. पण रात्रीची वेळ आणि वळण मार्गाची संधी साधून ते इतरत्र निघून गेले. दरम्यान रात्री ११.३० वाजताचे सुमारास भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार आपल्या काही समर्थकांसह कोसंबी येथे सभा घेऊन पैसे वाटप करणार असल्याची माहिती आमचे उमेदवार संतोषभाऊ रावत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे संतोषभाऊ रावत, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, आणि नगर परिषदेचे माजी सभापती बाबा अझीम येथे कोसंबी येथे पोहोचले, तेव्हा आचार संहीतेचे उल्लंघन करून सभा कशी काय घेत आहात ? अशी विचारणा केली असता सुधीर मुनगंटीवार यांनी मी पालकमंत्री आहे, मी काहीही करू शकतो, तुला त्याचे काय ? म्हणत संतोषभाऊ रावत यांचे अंगावर धावुन आले, त्याच क्षणी माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार हे संतोषभाऊ रावत यांचे समोर उभे झाल्याने मुनगंटीवार यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांनी चिमड्यालवा यांना बाजूला ढकलले. चिमड्यलवार जमिनीवर पडतात उपस्थितांमध्ये खळबळ माजली. उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर खुर्च्या फेकून मारण्यास सुरूवात केली. घटनेची माहिती होताच ठाणेदार सुमीत परतेकी सहकाऱ्यांसह अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहचले. गावांत अशांततेची परिस्थिती निर्माण होवु नये म्हणुन ठाणेदार यांच्या सुचनेनुसार घडलेल्या घटनेची तक्रार नोंदविण्यासाठी संतोषभाऊ रावत पोलीस स्टेशन येथे पोहोचले. सदर प्रकाराची माहिती होताच काँग्रेस शिवसेना आणि राकाँपाचा कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या मुनगंटीवार विरुद्ध नारे देत कारवाईची मागणी केली. संतोषभाऊ रावत यांनी मुनगंटीवार आणि त्यांच्या काही सहका-याविरूध्द आचारसंहीतेचे उल्लंघन केल्याबाबत तर वाहन चालक राजु गावतुरे यांनी सुधीर मुगंटीवार यांनी बुक्कीने मारहाण करून मोबाईल हिसकावुन नेल्याबाबत तक्रार नोंदवली आहे.
एखाद्या घटनेची तक्रार नोंदवायची झाल्यास पोलीस स्टेशन येथे येवुनच तक्रार नोंदवावी, असे पोलीस प्रशासनाचे निर्देश आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी कोसंबी येथील घटनास्थळीच संतोषभाऊ रावत, विजय चिमड्यालवार, राकेश रत्नावर आणि बाबा अझीम यांचे कडून आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार नोंदवली. संध्याताई गुरनुले यांनी नोंदवलेली तक्रार खरी आहे किंवा खोटी याबाबत व्हाँयरल झालेले व्हिडिओ तपासून बघितल्यास एवढ्या रात्री सभा घेणारे कोण ? आणि जनतेला मारहाण करणारे कोण ? याचा पुरावा जनतेसमोर येईल असा दावाही गुरूदास गुरुनुले यांनी केला. त्यामूळे मतदारांनी खोट्या भुलथापांना बळी न पडता संतोषसिंह रावत यांनी पाठीशी उभे राहावे. अशी विनंती गुरनुले यांनी केली.

कोसंबी येथे घडलेल्या प्रकरणाविषयी पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे एकमेकांविरूद्ध नोंदविलेल्या तक्रारीवरून काँग्रेसच्या चार व भाजपाच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले. प्रकरणाचा तपास ठाणेदार सुमीत परतेकी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here