भोई समाजाचा संतोषसिंह रावत यांना पाठींबा, समाजाच्या वतीने निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांची घोषणा

0
43

मूल : रास्त मागण्यांच्या पुर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकारकडे कित्येकदा मागणी करून शासनकर्त्यांनी भोई समाजाच्या रास्त मागण्याकडे सातत्याने लक्ष दिले नाही. त्यामूळे भोई समाज अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्या समस्यांची पुर्तता करण्यासाठी राज्यातील भोई समाजाने महाविकास आघाडीला सहकार्य करण्याचा निर्धार केला असुन बल्लारपुर विधानसभा निर्वाचन क्षेञात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांपाठींबा देत असल्याची घोषणा भोई समाजाचे नेते तथा निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी केली. संतोषसिंह रावत यांचे निवासस्थानी शिष्टमंडळासह अँड. चंद्रलाल मेश्राम यांनी भेट घेवुन पाठींब्याचे लेखी पञ दिले. मच्छीमार सहकारी संघ आणि मागास वर्ग आयोगाचे सदस्य म्हणुन मच्छीमार बांधवाच्या हितासाठी केंद्र व राज्य स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला. परंतु न्याय मिळत नसल्याने आता आमच्या आशा महाविकास आघाडी सरकारचं पुर्ण करू शकते. असा आमचा विश्वास आहे आणि म्हणुन आमचा भोई समाज व मच्छीमार बांधव यापुढे महाविकास आघाडी सोबतचं राहील. असा विश्वासही अँड. मेश्राम यांनी व्यक्त केला. यावेळी भोई समाजाचे जिल्ह्याचे नेते यशवंत दिघोरे, मच्छीमार संघ चंद्रपूरचे अध्यक्ष विलास शेंडे, संचालक पंकज शेंडे, महर्षी वाल्मिकी व्ही.जे.एन. टी.विभाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गेडाम आदी उपस्थित होते.

गोंडवाना अन्याय प्रतिकार संघटनेचाही पाठींबा
कोरोना काळात संतोषसिंह रावत यांनी समाज हिताच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले असुन हजारो नागरीकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांचे कडून होत असलेले सामाजिक कार्ये यापुढेही निरतंर होतराहावे म्हणुन गोंडवाना अन्याय प्रतिकार संघटनेचे अध्यक्ष जगदिश सेलमे, सचिव रमेश कन्नाके, कोषाध्यक्ष अरूण तलांडे यांनीही आज महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना पाठींबा जाहीर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here