*डाँ. अभिलाषा गावतुरे आणि राजु झोडे काँग्रेस पक्षामधुन निलंबीत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली कारवाई

0
55

मूल : पक्षादेश न पाळता काँग्रेस – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांचे विरूध्द अपक्ष उमेदवारी कायम ठेवुन पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचे कारणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी डाँ. अभीलाषा गावतुरे आणि राजु झोडे यांना सहा वर्षाकरीता काँग्रेस पक्षामधुन निलंबन केले. निलंबीत केलेल्या डाँ. अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपुर तर राजु झोडे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार संघामधुन काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांचे विरूध्द अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. डाँ. अभिलाषा गावतुरे आणि राजु झोडे यांनी अधिकृत उमेदवारा विरूध्द उमेदवारी कायम ठेवल्या नंतर पक्ष नेतृत्वाने या दोघांनाही उमेदवारी मागे घेण्यास कळविले होते. परंतु पक्षादेश न पाळता उमेदवारी कायम ठेवुन पक्षविरोधी कृती केल्याचे दिसुन आल्याने प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी डाँ. अभिलाषा गावतुरे आणि राजु झोडे यांचे सह राज्यातील सोळा बंडखोरांना सहा वर्षाकरीता काँग्रेस पक्षामधुन निलंबीत केले आहे. जिल्ह्यात दोन काँग्रेस बंडखोर उमेदवारांविरूध्द निलंबनाची कारवाई झाल्याने काँग्रेस पक्षातील त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पुन्हा काही दिवसात काँग्रेस बंडखोराविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार न करता विरोधक उमेदवारांचा प्रचार करतांना काँग्रेसचे जे पदाधिकारी निदर्शनास येतील त्यांचे विरूध्द पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचे कारणावरून योग्य कारवाई करावी. असेही निर्देश प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना दिल्याने गावतुरे आणि झोडे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. कोणता झेंडा घेवु हाती असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला असुन स्वतःहुन ते पक्षाचे राजीनामे देतील. असे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here