मूल :गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची निवडणूक तिरंगी होणार असल्याची चर्चा असली तरी ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असून काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत विरुध्द भाजपचे हेविवेट नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातच थेट लढत होण्याचे चित्र दिसत आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे मागील १५ वर्षापासून सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधित्व करीत आहेत.त्यांनी काँग्रेसचे राहुल पुगलीया,घनशाम मुलचंदानी व डॉ.विश्वास झाडे यांचा पराभव करून बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.त्यांनी मागील १५ वर्षात केलेल्या विकास कामांवर यावेळी मत मागत असेल तरी मागील १५ वर्षात त्यांनी या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही.तर शिक्षण,आरोग्य,सिंचनाच्या सोईकडे त्यांनी दुर्लक्ष केले.आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.त्यामुळे मागील १५ वर्षात त्यांनी क्षेत्रात अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ४८ हजार मताच्या मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दारुण पराभव केला.त्यामुळे आजही बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगार युवक,शेतकरी व महिलांमध्ये रोष असल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांना चांगलाच फटका बसणार या भीतीने गावागावात जावून प्रचार करण्याची वेळ भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.तर त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी कल्याण निधीतून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकांना उपचारासाठी घरपोच आर्थिक मदत केली आहे.तर वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली आहे.राजीव गांधी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारासाठी अर्थसाहाय्य दिले त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला.महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने महिला बचत गटांच्या महिलांना कर्ज पुरवठा केला.त्यामुळे शेतकरी,महिला व सुशिक्षित बेरोजगारांच्या मनात त्यांनी घर केले असल्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची निवडणूक भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना सोपी नसून दोघांमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.












