मूल : जिल्ह्यात दारूबंदी करून राज्याच्या महसुली उत्पन्नात हानी पोहोचविणा-या भाऊला मतांसाठी आता दारू विक्रेत्याची साथ घ्यावी लागत असल्याने दारूबंदीवाला ते दारू विक्रेता या महानाटयाच्या चर्चेला विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पेव फुटले आहे.
दारूमूळे कित्येक कुटूंब उघड्यावर पडली असून अनेकांना जीव गमवावा लागला. तसेच दारूमूळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असुन गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी करावी. अशी आग्रही मागणी करून दारूबंदी न केल्यास पदाचा राजीनामा देण्याचा गर्भीत इशारा सत्तेतील वरीष्ठांना दिला होता. भाऊच्या गर्भीत इशा-याची दखल घेवुन राज्याच्या तत्कालीन मुख्यमंञ्यानी भाऊची समजुत घालण्याचे अनेक प्रयत्न केले. जिल्ह्यात दारूबंदी केल्यास शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल, असे सांगुन शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हात दारूबंदी करण्याचा निर्णय मागे घेण्याचे वरीष्ठांनी भाऊला सुचवले. परंतु दारू विक्री सुरू असल्याने त्याचे समाजमनावर होणारे दुष्परीणाम आणि मतदारांसमक्ष घेतलेली भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी वरीष्ठांवर दबाव आणून तत्कालीन शासनकर्त्यांना संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे महीलावर्गासह अनेक सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनी भाऊंचे आभार मानत स्वागत केले. त्यामूळे जिल्ह्यातील अनेक दारू विक्रेत्यांनी आपल्या दारू दुकानाचा परवाना इतर जिल्ह्यात स्थानांतरीत केला तर काहींनी परवाने विक्री करून घरी बसण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारू शौकीनांचे व्यसन भागविण्यासाठी अनेकांनी जिल्ह्यात दारूचा अवैद्य व्यवसाय सुरू केला. राज्यातील इतर जिल्ह्यातील दारू दुकानांमधुन वाजवी दराने दारू खरेदी करून पोलीसांची नजर चुकवून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली, त्यामूळे बेरोजगारांना अधिकृत रोजगार ऐवजी अवैद्य व्यवसाय करण्याचा रोजगार मिळाल्यामूळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात देशी विदेशी दारूचा महापुर वाहु लागल्याने अवैद्य दारूच्या महापुरात राजकीय आणि पोलीसांच्या वरदहस्तामूळे अनेकांचे घोडे गंगेत न्हाले तर काहीजणांचा बळी गेला. दारू विक्री सुरू असताना ज्या प्रमाणात दारू विकल्या जात होती त्याच्या दुप्पटीने दारूबंदीच्या काळात दारू विकल्या जावु लागली. अवैद्य दारू विक्रेते मालदार झाले तर दारू शौकीनांची परिस्थिती आधी होती त्यापेक्षाही खराब होवु लागली. त्यामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात येवुन शासनाचे नुकसान टाळावे आणि दारू दुकानांवर अवलंबून असलेल्यांना आधार द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली. जनतेच्या मागणीस आणि शासनाचे महसुली नुकसान टाळण्यासाठी शासनाने दारूबंदीचे आदेश रद्द करून जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी दिली. दारू विक्रीचे आदेश लागु होताच जिल्ह्यातील अनेक दारू विक्रेते सक्रीय झाले, इतर जिल्ह्यात हलविलेले दारू विक्रीचे परवाने चंद्रपूर जिल्ह्यात पुर्ववत सुरू केले तर काहींनी आर्थिक व्यवहार करून नव्याने मिळवुन घेतले. त्यापैकी काही दारू दुकान मूल तालुक्यात सुरू झाले असुन अनेकांनी महामार्गाचे नियम धाब्यावर बसवुन तर काहींनी दारू दुकानासोबतच जुगाराचा अड्डाही सुरू केल्याची चर्चा आहे. या सर्व गैरप्रकाराची पोलीस प्रशासनाला माहीती असताना ते माञ बघ्याची भुमीका घेत असल्याने पोलीसाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातल्याच एका दारू विक्रेत्याने विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्षातंर केल्याने तालुक्यातील राजकारणात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. काँग्रेस पक्षाच्या नावांखाली विविध पद भोगत असताना ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाचा कासरा पकडल्याने सदर दारू विक्रेत्याच्या पक्ष बदला विषयी तर्कवितर्क लावल्या जात आहे. पक्षातंर केलेल्या सदर दारू विक्रेत्याच्या दुकानाविरूध्द परिसरातील महिला त्रस्त असून सदर दारू दुकान बंद करण्याची मागणी केल्या जात आहे. या कारणामूळे सदर दारू विक्रेता भयभित झाला असून दगडाखाली दबलेल्या हातांना संरक्षण मिळण्यासाठी पक्ष प्रवेश केल्याचे बोलल्या जात आहे तर दुसरीकडे जनतेच्या हितासाठी दारूबंदी झालीच पाहीजे. ह्या आग्रहाच्या पुर्ततेसाठी पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करून वरीष्ठांवर दबाव आणणाऱ्या नेत्याला मतांसाठी दारू विक्रेत्यांचा आधार घ्यावा लागत असल्याने सदर नेत्याच्या दारूबंदीच्या भुमीके विषयीही चर्चा आहे. पद प्राप्तीसाठी दारूबंदी करणाऱ्या त्या नेत्याला पुन्हा पद प्राप्तीसाठी दारू विक्री करणाऱ्याचा आधार घ्यावा लागत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे












