रेतीची अवैद्य वाहतुक करतांना भाजयुमोच्या दोन कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल

0
56

पोंभुर्णा : तालुक्यातील गंगापूरटोक जवळील वैनगंगा नदीमधील रेती घाट येथून अवैद्यरित्या रेती चोरी करून वाहतुक करत असतांना पोलीसांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले असून भाजपाच्या ग्रामीण अध्यक्षासह दोन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जुनगांव गंगापूर टोक गांवालगतच्या वैनगंगा नदीमधील रेती घाट येथून राजकिय वरदहस्ताचा वापर करून अवैद्यरित्या रेतीचा उपसा करून वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून घटनास्थळी पोहोचले असता महसुल प्रशासनाची कोणतीही परवानगी नसतांना दोन ट्रॅक्टर रेती भरून जात असल्याचे निदर्शनास आले. विना परवाना रेतीची वाहतुक करीत असल्याचे कारणावरून पोलीसांनी दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेवून विचारणा केली असता भाजयुमोचा अध्यक्ष असलेला राहुल पाल, कार्यकर्ते अजय चुदरी आणि प्रदीप चंदुलवार यांचा अवैद्य रेती वाहतुकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी राहुल पाल, अजय चुदरी आणि प्रदीप चंदुलवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यांत आला असून पुढील तपास पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार हरीद्रकुमार भारती, जगदीश पिपरे करीत आहेत. राजकिय वरदहस्ताचा वापर करून अवैद्य रित्या रेती वाहतुक करतांना पोलीसांनी भाजयुमोच्या ग्राम अध्यक्षासह कार्यकर्त्याविरूध्द पोलीसांनी कार्यवाही केल्याने परिसरात चर्चेला पेव फुटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here