मूल : सहकार्याची आठवण न ठेवता केवळ थॅक्यु म्हणून मोकळे होण्याच्या सध्याच्या परिस्थितीत माणुस माणसालाच नव्हे तर जन्मदात्यालाही विसरत आहे. दुसरीकडे मात्र पंचाहत्तर वर्षाच्या जीवन प्रवासात सहकार्य करणा-या एका निर्जीव वस्तुप्रती संवेदना बाळगुन तिच्या प्रती कृतज्ञता सोहळयाचे आयोजन व्हावे. याविषयी आश्यर्च व्यक्त केल्या जात आहे.
वयाच्या नव्वदीकडे वाटचाल करीत असलेल्या मूल येथील डाॅ. रामचंद्र दांडेकर यांनी हा आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा आयोजीत केला आहे. सदर सोहळयात पंचाहत्तर वर्षाच्या त्यांच्या सायकल प्रवासात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिनही ऋतु काळात मोलाची साथ देणा-या तेजस्विनी नामक सायकलची आठवण ठेवत तिच्या प्रती कृतज्ञता बाळगण्यात येणार आहे. राष्ट्रपित्याच्या पदस्पर्शाने पुण्यीत झालेल्या वर्धा जिल्हयातील पवनार लगतच्या एका खेडे गावांत जन्मलेले डाॅ. रामचंद्र तानबाजी दांडेकर मागील 65 वर्षापासून मूल आणि पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना आरोग्याची सेवा देत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत डिप्लोमा इन होमीयोपॅथीक अँण्ड बाॅयोकेमीक पर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर समाजाची सेवा हे ध्येय डोळयासमोर ठेवून त्यांनी चंद्रपूरच्या अंचलेश्वर वार्डापासून आरोग्य सेवेला सुरूवात केली. चंद्रपूर येथील वास्तव्याचे काळात त्यांनी एक वर्ष चंद्रपूरच्या होमीयोपॅथीक काॅलेज मध्यें अध्यापनाचे काम केले. शहरी भागातील वैद्यकिय व्यवसायात स्पर्धा होवू लागताच डाॅ. दांडेकर यांनी आपली सेवा ग्रामीण भागाकडे वळविली. समाज बांधवांच्या परिचयातून त्यांनी पोंभुर्णा, सुशि दाबगांव, देवाडा, केळझर परिसरात आरोग्य सेवेला सुरूवात केली. आरोग्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला परिसरात डाॅक्टर असल्याची माहिती होवू लागताच दिवसागणीक त्यांचेकडे रूग्ण संख्या वाढू लागली. दरम्यान अनेक रूग्ण वृध्द आणि अठरा विश्व दारीद्रयात जीवन जगणारे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रूग्ण सेवेसाठी परिसरात भ्रमतीचा निर्णय घेतला. भ्रमती करीता मोटार सायकल ची निवड न करता त्यांनी तेव्हाचे रस्ते, नाले आणि परिस्थिती लक्षात घेवून सायकलची निवड केली. हॅडलच्या दोन्ही बाजुला औषधांच्या चार पाच पिशव्या आणि अनवानी पायाने फिरत त्यांनी पोंभुर्णा पाठोपाठ मूल तालुक्यातील पंचेवीस ते तीस खेडे गांवात आरोग्याची सेवा सुरू केली. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत दररोज विस ते पंचेवीस कि.मी. अनवानी पायाने सायकलद्वारे भ्रमंती करून दररोज किमान 50 ते 60 रूग्णांना अत्यंत माफक दरात सेवा पुरवित आहेत. वयाच्या नव्वदी कडे वाटचाल करीत असतांना डाॅ. रामचंद्र दांडेकर उर्फ अण्णा शहरातील डाॅक्टरांसारखी अपेक्षा न बाळगता आजही अविरत, अविश्रांत आणि अखंड सेवा पुरवित आहेत. कोरोना महामारीच्या काळात असंख्य डाॅक्टरांनी दवाखाने बंद पाळून रूग्णापासून पळ काढण्याचा पराक्रम केला परंतू वयाची आणि मृत्युची तमा न बाळगता डाॅ. रामचंद्र दांडेकर यांनी कोरोना महामारीच्या काळातही रूग्ण सेवा सुरूच ठेवली. या महान कार्यासाठी डाॅ. रामचंद्र दांडेकर यांचा अनेक सेवाभावी संस्थाशिवाय जपान येथील द सुप्रीम मास्टर चिंग हैय इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने शायनिंग वल्र्ड कॅम्पेसेशन अवार्डने सन्मानीत केले. वाढत्या वयातही अण्णा दररोज अनवाणी पायाने सायकलने ग्रामीण भागात भ्रमंती करतात म्हणून कुटूंबियांनी त्यांना मोपेड वापरण्याचा आग्रह केला. परंतू मोपेडच्या गतीत आरोग्य सेवा पुरविणे कठीण होईल. या भितीने त्यांनी मोपेडचा त्याग करून सायकलचा प्रवास कायम ठेवला. जीवनातल्या या सर्व घडामोळीत जे काही मिळाले ते कुटूंबातील सदस्य आणि सहका-यांच्या सहकार्याशिवाय ग्रामीण भागात आरोग्याची सेवा पोहोचविण्यात ऊन्ह, वारा, पाऊस, थंडी अश्या अनेक समस्यांना सामोरे जात सहकार्य करणा-या तेजस्विनीने मोलाची साथ दिली. तिच्या सहकार्याशिवाय डाॅ. दांडेकर यांना ग्रामीण भागात आरोग्याची सेवा पोहोचविणे कठीण होते. आज जे काही आहे ते तेजस्विनी नामक सायकलमूळे आहे. ती नसती तर मी शुन्य राहीलो असतो. तिचे आभार माणावे तेवढे कमीच आहे. असे म्हणून डाॅ. रामचंद्र दांडेकर यांनी तिनही ऋतुमध्यें आरोग्याची सेवा पोहोचविण्यास मोलाची साथ देणा-या सायकलचा दिमाखदार कृतज्ञता सोहळा आयोजीत केला आहे. स्थानिक रामलिला भवन येथे आयोजीत तेजस्विनी नामक सायकलच्या कृतज्ञता सोहळयाला अनेक मान्यवरांना पाचारण केले असून स्नेहभोजनाने कृतज्ञता सोहळयाची सांगता होणार आहे. त्यामूळे या आगळया वेगळया कार्यक्रमाची मूल आणि पोंभुर्णा तालुक्यात चर्चा होत आहे.












