मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल, चिरोली आणि राजोली शाखेच्या वतीने उद्या रविवार १४ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वा. स्थानिक श्री दुर्गा मंदीर सभागृहात महीला बचत गट मेळावा आयोजित केला आहे. आयोजित मेळाव्यात शाखा अंतर्गत उत्कृष्ठ कार्ये करणाऱ्या बचत गटांचा सन्मान करण्यात येणार असुन कर्ज वाटप करण्यात येणार आहे. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या महीला बचत गट मेळाव्याला बँकेचे चार विभागाचे कर्ज समिती अध्यक्ष आणि संचालकवृंद उपस्थित राहणार आहेत. आयोजीत मेळाव्याला बचत गटाच्या महीलांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे.अशी विनंती विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार आणि तिनही शाखेच्या शाखा प्रमुखांनी केली आहे.












