मुल – ऑगस्ट 2024 ला चंद्रपूर येथे होणाऱ्या ओबीसी महापरिषदेची प्राथमिक पूर्वतयारी बैठक रविवार दिनांक ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी 5 वाजता पत्रकार भवन मुल येथे आयोजित केलेली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे राहणार असुन प्रसिद्ध सर्जन, बहुजन समता पर्वाचे अध्यक्ष तथा ओबीसी आंदोलनाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय घाटे, बहुजन समता पर्वचे जिल्हा मुख्य संयोजक तथा ओबीसी आंदोलनाचे मार्गदर्शक डाँ.,दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेमध्ये ओबीसी परिषदेच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येणार असुन त्यानुषंगाने मुल तालुका समन्वय समितीचे गठण करण्यात येणार आहे. तरी सर्व इच्छुक स्वयंसेवी ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन भारतीय ओबीसी महापरिषद संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












