मूल : स्पर्धेच्या आजच्या युगात टिकायचे असेल तर परीश्रमा शिवाय पर्याय नाही. भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ध्येय समोर ठेवुन परीश्रम केल्यास स्पर्धेच्या युगात यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे. स्पर्धेची तयारी आणि परीश्रम करण्याच्या मानसिकते मधून उत्तूंग यश प्राप्त होते. असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले. गुजरी चौकातील फडणवीस वाडा येथे नुकताच संपन्न झालेल्या स्वामी विवेकानंद विद्या मंदीर मधील गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्काराच्या छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संस्थेचे सचिव अनिल संतोषवार, सहसचिव मोती टहलियानी, संचालक देवराजभाई पटेल, संजय चिंतावार, राजू पटेल, मुख्याध्यापक नितिन घरोटे आदी उपस्थित होते. संस्थेतंर्गत कार्यरत असलेल्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल यावर्षी 100 टक्के लागला. 115 विदयार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 47 विदयार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 41 विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादने केले.1992 मध्ये स्थापना झालेल्या या शाळेने दहावीच्या उत्कृष्ट निकालाची पंरपरा कायम राखली आहे. याचे संपूर्ण श्रेय शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन मंडळाचे असल्याचे शोभाताई फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यशोशिखर प्राप्त केलेल्या आसावरी लेनगूरे (93.80 टक्के),सलोनी सुरमवार (93.76 टक्के),पूर्वा कानमपल्लीवार (92 टक्के),वंशिका चिताडे (90 टक्के) या चार विदयार्थीनींचा शाल,श्रीफळ देऊन शोभाताई फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुख्याध्यापक नितिन घरोटे यांनी मानले. यावेळी पालक वृंद, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












